आता आधार कार्ड सारखे हेल्थकार्ड देखील मिळणार आहे.
डिजिटल हेल्थ मिशनच्या अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीचे युनिक हेल्थ कार्ड बनविणार आहे.
हे कार्ड डिजिटल स्वरूपाचे असेल.
आधारकार्ड सारखे याचाही एक नंबर मिळेल, ज्या वरून आरोग्य क्षेत्रात आधार कार्ड प्रमाणे, तुम्हाला त्यात एक नंबर मिळेल.यामुळे आरोग्य क्षेत्रातील व्यक्तीची ओळख होईल.
यासह, डॉक्टरांना आपले संपूर्ण आरोग्य रेकॉर्ड कळेल.
या युनिक हेल्थ कार्डवरून असे देखील कळेल की, व्यक्तीचा उपचार आतापर्यंत कुठे कुठे झाला आहे.
तसेच त्या व्यक्तीसंबंधित असलेली संपूर्ण माहिती त्या युनिक हेल्थ कार्डवरून मिळेल.
हे सोयीचे असून आता प्रत्येक ठिकाणी रुग्णाला त्याची आरोग्या संबंधित असलेली फाईल नेण्याची गरज नाही.
डॉक्टर किंवा रुग्णालय या युनिक हेल्थ कार्डवरून रुग्णाची आरोग्य स्थिती समजून त्याचा उपचार करू शकेल.
तसेच या कार्डवरून व्यक्तीला मिळणाऱ्या सरकारी योजनांच्या बाबतीत पण कळेल.
रुग्णाला आयुष्यमान भारत योजने अंतर्गत उपचारांच्या सुविधा मिळत आहेत कि नाही, हे देखील याची माहिती देखील युनिक हेल्थ कार्डवरून मिळेल.
मोबाइल नंबरचा वापर करून एक नंबर आयडी बनेल.
आधार कार्ड सारखेच युनिक हेल्थ कार्डचा डेटाबेस सरकार तयार करेल.
तसेच त्या आयडीसोबत व्यक्तीचा आरोग्य संबंधीत सर्व डेटा त्यात समाविष्ट करेल.
या वरून त्या व्यक्तीने कुठे कुठे उपचार केले, त्याचा मेडिकल रेकॉर्ड काय आहे तसेच त्याने कोणते औषध घेतले याची सर्व माहिती त्यात दिलेली असेल.