लखीमपूर खेरामधील शेतकर्यांची हत्या पूर्वनियोजित कटच होता. हा शेतकर्यांचा अवमान आहे. हे भयकंर आहे. संपूर्ण देशामध्ये हुकूमशाही सुरु असल्याचे चित्र आहे, असा आराेप करत हत्या झालेल्या शेतकर्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही आहोत. आज मी लखीमपूर खेरा येथे पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणार आहोत, अशी माहिती काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी राहुल गांधी म्हणाले, देशात एकीकडे शेतकर्यांची हत्या होत आहे. भाजपच्या केंद्रीय गृह राज्यमंत्री व त्यांच्या मुलावर कोणतेही कारवाई करण्यात आलेली नाही, यावरुनच केंद्र सरकारचे धोरण स्पष्ट होते. मागील काही महिने अन्यायकारक कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. आपल्या घटनात्मक हक्कांवर भाजपकडून दबाव येत आहे. देशातील सर्व संस्थांवर केंद्र सरकारचे नियंत्रण आणत आहे. इंधनाचे दर वाढत चालले आहेत. शेतकर्यांवर अन्याय होत आहे. शेतकर्यांवर ठरवून अन्याय केला जात आहे. आम्ही लोकशाही तत्वांसाठी संघर्ष करत आहोत, असेही त्यांनी नमूद केले.