भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडने आज एक गाणे लाँच केले आहे. या गाण्यात जम्मू-काश्मीरचे नैसर्गिक सौंदर्य अधोरेखित करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचा सांस्कृतिक वारसा आणि विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘प्यारा जम्मू काश्मीर’ हे राष्ट्रीय एकता गीत लाँच करण्यात आले. या गाण्याच्या गायकांमध्ये सोनू निगम, जावेद अली आणि हर्षदीप कौर यांचा समावेश आहे. या गाण्यात काश्मीरच्या सुंदर खोऱ्यांची अनेक झलक दाखवण्यात आली आहेत.
या गाण्याद्वारे बॉलीवूड गायक आणि कलाकारांनी जम्मू-काश्मीरमधील नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक वारसा आणि विविधतेचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. गाण्याची सुरुवात काश्मीरच्या सुंदर खोऱ्यांच्या सादरीकरणाने होते. ‘प्यारा जम्मू काश्मीर’ या गाण्यात बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा देखील आहे, ज्याने त्याच्या आवाजात म्हटले आहे की, ‘पर्वत ने बाहें फैलाईं’. या गाण्यात अनेक गायक आणि पात्रांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरवर बनलेले हे गाणे नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल वायके जोशी यांनी लाँच केले आहे.