देशात आज फक्त कामगार आणि शेतकऱ्यांच्या चळवळी शिल्लक आहेत. त्या संपवण्याची व्यवस्था निर्माण होत आहे. दिल्लीत वर्षभरापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. ते मोडून काढण्याचे मोदींचे प्रयत्न सुरू आहेत. या स्थितीत आपणच परस्परच आधार दिला पाहिजे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले.
नव्या कायद्याद्वारे शेतकरी व कामगार संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते हाणून पाडायला हवेत. चळवळ जिवंत राहिली पाहिजे. चांगल्या कंपन्या विकण्याचा सपाटा सुरू आहे. काँग्रेसवाल्यांनी चळवळ संपवण्याचे काम केले अशी टीका शेट्टी यांनी केली.
दरम्यान, गेल्या तीन ते चार दशकांपासून सहकारी साखर कारखान्यांना प्राप्तिकर विभागाच्या नोटिसा येत होत्या. यासंदर्भात एक परिपत्रक जारी करून ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अधिक पेमेंट झाल्यास प्राप्तीकराच्या नोटीसेस त्यांना प्राप्त होत होत्या. मात्र, आता तसे होणार नाही, एक महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता साखर कारखान्यांना २०१६ नंतरचा आयकर लागणार नाही. हा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याबद्दल आणि त्यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे.