1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘आरएसएस’ ही नक्षलवादी संघटना; भूपेश बघेल

bhupesh-baghel
Spread the love

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तुलना नक्षलवाद्यांशी केली आहे. बुधवारी भूपेश बघेल म्हणाले की, ज्याप्रमाणे राज्यातील नक्षलवादी इतर राज्यांमध्ये बसलेल्या त्यांच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कामे करतात त्याचप्रमाणे स्थानिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते नागपुरातून चालवले जातात. मुख्यमंत्री भूपेश बघेल गेल्या आठवड्यातील वर्धा हिंसाचाराबाबत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, “वर्धा हिंसाचाराच्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल. छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या १५ वर्षांच्या राजवटीत, आरएसएसच्या लोकांनी काहीच केले नाही आणि ते अजूनही बंधनग्रस्त मजुराप्रमाणे काम करत आहेत. आजही त्यांचे (आरएसएस कार्यकर्ते) ऐकले जात नाहीत आणि ते नागपुरातून नियंत्रित केले जातात.”

“जसे नक्षलवाद्यांचे नेते आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि इतर राज्यांत आहेत आणि येथील लोक फक्त गोळीबार आणि गोळ्या खाण्याचे काम करतात, अशीच परिस्थिती संघाची आहे. जे काही आहे ते नागपूरचे आहे. येथे आरएसएस लोक बंधु मजुरांसारखे काम करत आहेत. यांचे काहीही चालत नाही, त्या सर्वांना नागपुरातून नियंत्रित केले जाते”, असे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले.

यापूर्वी छत्तीसगड काँग्रेसने वर्धा हिंसाचारामागे भाजपा आणि इतर उजव्या विचारसरणीच्या संघटनांचा हात असल्याचा आरोप केला होता. गेल्या आठवड्यात वर्धा हिंसाचाराप्रकरणी भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांचा मुलगा अभिषेक सिंह याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    डिजिटल करेंसीवर नियंत्रणासाठी जागतिक तंत्र तयार करण्...

    December 4th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveइन्फिनिटी फोरममध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन क्रिप्टोकरन्सी विषयी माहिती दिली अर्थमंत्री निर्मला सीताराम...

    भारतीय सैनिक शहीद होताहेत; तरी पाकीस्तिनसोबत टी-20 स...

    October 19th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveओवैसींचा भाजपाला सवाल भारतात मागील काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ...

    द्रौपदी मुर्मू भारताच्या वाईट तत्वज्ञानाचे प्रतिनिधि...

    July 13th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: काँग्रेस नेता आणि प्रवक्ता अजय कुमार यांनी एका नव्या वादाला सुरवात केली आहे. त्यांनी म्हटले कि एनडी...