महाराष्ट्र शासनाकडून पदांच्या भरतीसाठी विविध परीक्षा घेतल्या जातात. त्याकरिता प्रवेशपत्र परीक्षार्थींना दिले जाते. त्यात परीक्षा देणाऱ्याचे नाव, परीक्षा केंद्र, परीक्षेचे वेळ, परीक्षा दिनांक, तसेच परीक्षे संबंधी इतर माहिती त्यात दिलेली असते. पण शनिवारी २५ सप्टेंबर आणि रविवार २६ सप्टेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या परीक्षेत शासनाने चांगलाच घोटाळा करून ठेवला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या परीक्षा उमेदवारांना फक्त महाराष्ट्राबाहेरील केंद्र आले नसून चक्क देशाबाहेरील परीक्षेचे केंद्र मिळाले आहे. उमेदवारांना चीन देशातील परीक्षेसाठी केंद्र मिळाले आहे. कोणाला उत्तर प्रदेश नोएडा अशी ठिकाण मिळाली आहे, तर कोणाला अर्धाच परीक्षा केंद्राचा पत्ता आला आहे.
अनेकांच्या नावे चुकीची आहेत. परीक्षार्थींनच्या नावाच्या ठिकाणी वडिलांचे नाव किंवा आईचे नाव आले आहे. लिंग भरण्याच्या ठिकाणी मुलगा असल्यास महिला लिहून आले आहे आणि तसेच मुलगी उमेदवारांच्या ठिकाणी पुरुष लिहून आले आहे. आधारकार्ड हे ओळखपत्र पाहून विद्यार्थ्यांना शासन परीक्षा देण्याची परवानगी देणार तर मग विद्यार्थ्यांच्या नावाच्या घोटाळा कसा सोडवणार? हा मोठा प्रश्न आहे.
तसेच काही विद्यार्थ्यांनी दोन वेगवेगळ्या पदासाठी असलेल्या परीक्षेसाठी भरले असल्यास दोन्ही परीक्षेची एकाच वेळ देण्यात आली आहे, आणि त्यातही दोन वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये परीक्षार्थींना परीक्षेचे सेंटर देण्यात आले आहे. तसेच सेंटरचे नाव आले तर जिल्हा आला नाही, तालुका आला नाही मग विद्यार्थी सेंटर शॊधणार कस ?
आरोग्य विभागाच्या विविध पदाच्या परीक्षा आहे. जसे आरोग्य सेवक, क्लर्क, लॅबोरेटरी असिस्टंट अशा अनेक पदांच्या परीक्षा शनिवारी २५ सप्टेंबर आणि २६ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र्र शासनाकडून परीक्षेच्या अगदी दोन दिवस अगोदर प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना देण्यात आले. काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट किंवा प्रवेशपत्र डाउनलोड होण्यात देखील समस्या येत होत्या.