केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडावीया यांचे वर्ल्ड हेअल्थ ऑर्गनायझेशनच्या चीफ ने आभार मानले. भारताने पुढील महिन्यापासून अतिरिक्त लसींची निर्यात आणि लसीचा पुरवठा देणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
जगभरात भारताने एकूणच लसींची सर्वात मोठी निर्मिती केली आहे. याकरीता भारताला “फार्मसी ऑफ द वर्ल्ड” चे नामांकन मिळाले आहे. एप्रिलमध्ये लसींची निर्यात थांबवण्यात आली होती. जेणेकरून तिसरी लाट येण्याअगोदर जास्तीत जास्त भारतीयांच्या लसीकरण वर भर दिला जाईल. भारतीय लोकसंख्या लसीकरण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या या मागचा उद्देश होता.
डब्ल्यूएचओ आणि जीएव्हीआय लस अलायन्स हे कॉव्हॅक्स सुविधेचे नेतृत्व करीत आहेत, ज्याचा उद्देश संपूर्ण जगभरात कोरोनाव्हायरस विरूद्ध लसी खरेदी आणि वितरीत करण्यात मदत करणे आहे. अमेरिकन एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएआयडी) च्या प्रशासक समंथा पॉवर यांनी मे महिन्यात सांगितले होते की, भारतात कोरोना प्रकरणांचा उद्रेक झाल्यानंतर कोव्हॅक्सच्या जागतिक पुरवठ्याला मोठा धक्का बसला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळवारपासून वॉशिंग्टन दौऱ्यापूर्वी निर्यातीची चर्चा पुन्हा सुरू झाली, जिथे अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांच्या नेत्यांच्या शिखर परिषदेत लसींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. नवीन एक्स्पोर्ट ड्राईव्ह “व्हॅक्सिन मैत्री” च्या अंतर्गत हे जगभरातील कोवॅक्स लस पुरवठा प्लॅटफॉर्म असून लगतच्या देशांना लस पुरवठ्यात प्रधान्य दिले जाईल, असे मांडवीया यांनी म्हटले.