1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

गुजरातमध्ये 1500 कोटी खर्चून उभारले जाणार जगातील सर्वात मोठे टॉय संग्रहालय

toy-muesum
Spread the love

अमेरिकेतील Branson, Missouri येथे सध्या जगातील सर्वात मोठे टॉय संग्रहालय असून त्याठिकाणी प्राचीनपासून आधुनिक काळातील १० लाखांपेक्षा जास्त खेळणी उपलब्ध आहेत. त्यानंतर आता आपल्या देशात त्याहून मोठे टॉय संग्रहालय उभारण्यात येणार आहे.

जगातील सर्वात मोठे हे टॉय संग्रहालय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ३० एकर जागा देण्यात आली असून गुजरातच्या बाल विद्यापीठाच्या बाल भवन प्रकल्पांतर्गत ते बांधले जाणार आहे. येथे प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतची ११ लाखांपेक्षा जास्त खेळणी ठेवली जाणार आहेत. शास्त्रज्ञ, कलावंत, महापुरुषांची खेळण्यांद्वारे ओळख करणे आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्याचा यामागे हेतू आहे. राज्याची राजधानी गांधीनगर येथील गिफ्ट सिटीजवळ शाहपूर आणि रतनपूर गावांच्या दरम्यान जगातील सर्वात मोठे हे टॉय संग्रहालय करण्याची तयारी आहे. सुमारे १५०० कोटी या बालभवनावर रुपये खर्च करण्यात येणार आहेत, तर ते तयार होण्यास पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे.

बाल विद्यापीठाचे कुलगुरू हर्षद शहा यांनी याबाबत माहिती देताना, या संग्रहालयाच्या बांधकामास येत्या दोन-तीन महिन्यांत प्रारंभ होईल. पंतप्रधान मोदींना भूमिपूजनासाठी निमंत्रित केले जाईल. पंतप्रधान स्वत: सक्रिय मार्गदर्शन करणार आहेत. २२ ऑगस्टला यासाठी पंतप्रधानांनी ऑनलाइन संवादही साधला. बाल विद्यापीठाला टॉय संग्रहालयाच्या प्रकल्पाशी संबंधित प्रेझेंटेशन सादर करायला त्यांनी सांगितले होते. त्याचबरोबर बाल विद्यापीठाच्या या योजनेत पूर्ण ताकदीने काम करण्याची सूचना त्यांनी केली.

Claim Free Bets

या संग्रहालयाच्या माध्यमातून मुलांना शास्त्रज्ञ, कलाकार, महापुरुषांची ओळख आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले जाईल. त्याचबरोबर गगनयान, क्षेपणास्त्रे, ईव्हीएम यंत्र, १८५७ ची क्रांती इत्यादींची माहिती खेळण्यांच्या माध्यमातून सांगितली जाईल.

बाल विद्यापीठाचा गुजराती, हिंदी, इंग्रजीसह अनेक भारतीय भाषा शिकण्यासाठी अभ्यासक्रम असेल. डीआरडीओ, इस्रोच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक, बॅटरी, सोलार आधारित लहान यान, पृथ्वी-अग्नी क्षेपणास्त्र, उपग्रह आदींच्या प्रतिकृतीत खेळणी तयार केली जातील. खेळण्यांद्वारे बालमनाला शिक्षण संस्कार देण्याचे विचार लक्षात घेऊन बाल विद्यापीठ खेळणीशास्त्र विकसित करेल.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राज्यसभेची निवडणूक लढवणार नाही; संभाजी राजे

    May 27th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveसंभाजीराजे छत्रपती यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी राज्यसभा निवडणुकीला सामोरे...

    व्हिडीओ व्हायरल : गाझियाबादमधील विकृताला तंदूरमध्ये ...

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक माणूस ज्यात थुंकून रोटी...

    “आरएसएस शाखेत प्रशिक्षण घेणारे विधानसभेत ब्ल्य...

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांन...