भारतातील महिला ईव्ही क्रांती जगासमोर आणतील!
इलेक्ट्रिक स्कूटर निर्मितीत जगातील सर्वात मोठी कंपनी बनणाऱ्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या कारखान्यात तब्बल दहा हजार महिला कर्मचारी काम करणार आहेत. तामिळनाडूत हा कारखाना उभारला आहे.
लवकरच तो पूर्ण क्षमतेने चालविला जाणार आहे.तामिळनाडूत इलेक्ट्रिक स्कूटर निर्मितीचा ओलाचा सर्वात मोठा कारखाना आहे.
कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश अग्रवाल यांनी सोमवारी ही माहिती दिली. विशेष म्हणजे हा कारखाना महिलाच चालविणार आहेत.
ओला इलेक्ट्रिक एस 1 आणि एस 1 प्रो स्कुटर ही दोन मॉडेल तयार करण्यात येत आहेत.
पहिल्या टप्प्यातील कारखान्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. वर्षात २ कोटी स्कुटर निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे.
देशाबरोबर परदेशात स्कुटरची निर्यात केली जाणार आहे.
विशेष म्हणजे अमेरिकेतही पुढील वर्षी निर्यात होणार आहे.
भाविश अग्रवाल यांनी ट्विटर आणि ब्लॉगवर याबाबत अधिक माहिती देताना लिहिले आहे की, कारखाना संपूर्णतः महिलाच चालवणार आहेत.
आत्मनिर्भर भारताला आत्मनिर्भर महिलांची गरज असल्याने दहा हजारांवर महिलांची नियुक्ती केली जाणार आहे.
महिला चालवत असलेली जगातील हा सर्वात मोठा कारखाना असेल.
अग्रवाल पुढे म्हणाले, “भारत हे जगातील उत्पादन केंद्र बनण्यासाठी, आम्ही आमच्या महिला कामगारांसाठी अपस्कीलिंग आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले पाहिजे.”
ओलाने गेल्या वर्षी तामिळनाडूमध्ये पहिला इलेक्ट्रिक स्कूटर कारखाना उभारण्यासाठी 2,400 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती.
पुरुषांप्रमाणेच महिला काम करू शकतात.
तसेच महिलांना मदत करण्याच्या उद्देशाने कंपनीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. महिलांना त्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याबरोबर कुटुंब देखील चालवू शकतील असेही अग्रवाल म्हणालेत.
ओला स्कुटरचा हा प्लांट ५०० एकर क्षेत्रावर वसला असून त्यासाठी कंपनीने तामिळनाडू सरकारबरोबर २ हजार ४०० कोटींचा करार केला आहे.
भूसंपादन जानेवारीत झाले आहे. फेब्रुवारीमध्ये बांधकाम सुरु झाले.
तसेच स्कुटर निर्मितीत ५ हजार रोबोटचा वापर केला जाणार आहे.
ओला एस 1 स्कुटर बाजारात आली असून तिची किंमत १ लाख रुपये आहे.
ज्यांनी बुकिंग केले आहे त्यांना ऑक्टोम्बरपासून वितरणाला सुरुवात होणार आहे.
त्यासाठी वितरक नेमले नसून थेट होम डिलिव्हरी केली जाणार आहे.