राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दीच्या सर्व ठिकाणांवर जाणं बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. या काळात सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. राज्यातील शाळा, महाविद्यालये, प्रार्थनास्थळे, सिनेमागृह, नाट्यगृह हे सर्वच ठिकाणे बंद होती. मात्र कोरोनाची संख्या आता आटोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.
कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे, राज्यशासनानं जारी केलेल्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरात घालण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता आली आहे. यानुसार, येत्या शुक्रवारपासुन शहरातील नाट्यगृहे पुन्हा सुरु होणार आहे. नाट्य गृहांपाठोपाठ बंदीस्त सभागृहे आणि मोकळ्या जागेत होणा-या सांस्कृतिक कार्यक्रमांनाही हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. तथापि, आसन क्षमता पन्नास टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली असून, कलाकारांचं लसीकरण पूर्ण झालं असल्याची अट घालण्यात आली आहे.