1. Coronavirus pandemic live updates: India reports a single-day rise of 253 new Covid cases in India 2. ‘I carry India with me wherever I go’: Google and Alphabet CEO Sundar Pichai 3. Aaftab used Chinese knife to dismember Shraddha's body, chopped her 1. कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला लाइव्ह अपडेट्स: भारतात एकाच दिवसात 253 नवीन कोविड प्रकरणांची नोंद झाली आहे 2. ‘मी जिथे जातो तिथे भारताला माझ्यासोबत घेऊन जातो’: गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई 3. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी आफताबने चायनीज चाकू वापरला, आधी तिचे हात कापले: सूत्र

‘मग दद्दारी कुणी केली’? एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना सवाल

Eknath_shinde-thefreemedia

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन केल्याचा आरोप केलाय. तसेच गद्दारी, विश्वासघात आम्ही केला की इतर कुणी केला? असा सवालही केला. शिंदे सध्या तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शनिवारी (३० जुलै) ते नाशिकमधील मालेगावमध्ये सभेला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्ला चढवला.

एकनाथ शिंदे म्हणाले, “भाजपा-शिवसेना युतीने निवडणूक लढलो. लोकांनी आपल्याला कौल दिला. त्या लोकांसोबत सत्तास्थापन करण्याऐवजी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रीपद मिळवलं. मग गद्दारी आम्ही केली का? विश्वासघात आम्ही केला का? हा विचार करण्याची आवश्यकता आहे.”

“बाळासाहेबांच्या भूमिकेशी विश्वासघात आम्ही केला की इतर कुणी केला”? “बाळासाहेब ठाकरेंनी ज्या काँग्रेस राष्ट्रवादीला थारा दिला नाही, त्यांना तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी जवळ केलं. स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केलं, मग विश्वासघात कुणी केला? तुम्ही केला की आम्ही? ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाशी कधीही तडजोड केली नाही त्या बाळासाहेबांच्या भूमिकेशी प्रतारणा, विश्वासघात आम्ही केला की इतर कुणी केला याचा विचार करण्याची आवश्यकता आहे,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.

“आम्हाला सावरकरांविषयी अपमानजनक शब्द काढणाऱ्यांविरुद्ध बोलता येत नव्हतं” “सावरकरांविषयी अपमानजनक शब्द काढणाऱ्या काँग्रेसच्या लोकांविरुद्ध आम्हाला बोलता येत नव्हतं. तोंडाला पट्टी लावून बसावं लागत होतं. मग विश्वासघात आम्ही केला की आणखी कुणी केला,” असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

“तुम्ही आमचे आईबाप काढता, आम्ही कधी आई-बापांना भेटलो?”
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “आम्ही जीवाची बाजी लावून शिवसेना मोठी केली आहे. शिवसेना अशीच मोठी झालेली नाही. वयाच्या १६ व्या वर्षापासून आम्ही शिवसेना वाढीसाठी मेहनत करतो आहे. तुम्ही आमचे आईबाप काढता. आम्ही कधी आमच्या आई-बापांना भेटलो, कधी आमच्या मुलाबाळांना भेटलो ते सांगा. आम्ही वर्षातून दोन दोन, तीन तीन वेळा परदेशात गेलो नाही. फक्त शिवसेना एके शिवसेना करत राहिलो.”

Avatar

RAHUL PATIL

All Posts

Latest News

Related Post

निखत झरीनची जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ‘सुवर्ण’ कामगिरी

May 20th, 2022 | RAHUL PATIL

भारताने क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी करत जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारताची बॉक्सिंगपटू निखत...

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले महत्वा...

September 12th, 2022 | RENUKA KINHEKAR

नागपूर : राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय शिंदे- फडणवीस सरकारकडून घेण्यात आले....

रामदास कदम यांना विधानभवनाच्या गेटवर अडवलं

December 24th, 2021 | RAHUL PATIL

राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. गुरु...