नागपूरचे रहिवासी शाश्वत साखरे यांना लसीच्या दुसऱ्या डोजकरीता नागपूर महानगरपालिकेचे लसीकरण केंद्र “आयुष इस्पितळ डेडिकेटेड कोविड केअर सेंटर”, सदर ,नागपूर येथे सकाळी १० वाजताची वेळ देण्यात आली होती. पण ते दिलेल्या वेळेवर गेले असता तेथे डॉक्टर, नर्स अथवा कोणताही स्टाफ कोणीही उपस्थित नव्हता. “अशा कारणांनी भारतात लसीकरण हळुवार सुरु आहे. लस उपलब्ध आहे, पण लोंकाना असा त्रास सहन करावा लागत आहे. “, असेही ते म्हणाले.
मनपा तर्फे नागरिकांना मोठया प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येते. पण नागरिकांना असे अनुभव येत असल्यास ते लस कुठून घेणार? हा प्रश्न आहे. सध्या नागपुरात ७ पॉसिटीव्ह रुग्ण आहेत. “राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिका शासकीय केन्द्रावर सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना मोठया प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना प्रथम डोज, दूसरा डोज घेण्यासाठी लस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहे”, असे मनपा कडून संदेश जारी करण्यात येतो पण सत्यता हि काही वेगळीच असते.