1. Doha bound IndiGo flight diverted to Pakistan's Karachi due to a medical emergency onboard. 2. 'Naatu Naatu' from RRR wins the Oscar for the Best Original Song. 3. India's 'The Elephant Whisperers' wins Oscar award for the Best Documentary Short 1. मुंबई : कमला नगरमधील झोपडपट्टीत लागली भीषण आग.  2. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर 'फीडबॅक युनिट' या कथित स्नूपिंग प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालवण्यास गृह मंत्रालयाने दिली मंजुरी. 3. हरित ऊर्जेला मुख्य प्राधान्य देण्याच्या भारत सरकारच्या निर्णयामुळे खुश आहे: डेन्मार्कचे एन्व्हॉय.

तरंगत्या दगडात बांधले गेलेय हे ८०० वर्षे जुने मंदिर

temple built in floating stone

भारताची ओळख मंदिराचा देश अशीही आहे. देशात अशीही अनेक मंदिरे आहेत जी रहस्यमयी म्हणून ओळखली जातात. ही यादीही भली मोठी आहे. त्यातील एक प्रसिद्ध मंदिर तेलंगणाच्या वारंगळ येथे असून हे मंदिर शिवाला समर्पित आहे. हे मंदिर तरंगणाऱ्या दगडातून बनविले गेले आहे. हे शिवमंदिर रामाप्पा मंदिर नावाने प्रसिद्ध असून मंदिराला हे नाव मंदिर बांधणारे शिल्पकार रामाप्पा याच्यावरून दिले गेले आहे.

१२ व्या शतकात काकतीय वंशाचा राजा गणपती देवा याने १२१३ मध्ये या मंदिराचे बांधकाम सुरु केले आणि ते पूर्ण होण्यास ४० वर्षे लागली. या काळातील अनेक मंदिरे आज भग्नावस्थेत आहेत मात्र रामाप्पा मंदिर अनेक नैसर्गिक आघात सोसूनसुद्धा आजही चांगल्या स्थितीत आहे. हे मंदिर अजूनही चांगल्या स्थितीत कसे याचे संशोधन वैज्ञानिकांनी केले पण काही उलगडा झाला नाही तेव्हा त्यांनी मंदिरात वापरल्या गेलेल्या दगडाचे परीक्षण केले. हे दगड अतिशय हलके आहेत आणि त्यांचे तुकडे पाण्यात तरंगतात असे यातून दिसून आले.

हे मंदिर सहा फुट उंचीच्या जोत्यावर बांधले गेले असून मंदिराच्या भिंतीवर रामायण महाभारतातील प्रसंग कोरले गेले आहेत. हे सर्व काम अतिशय सुबक आणि सुंदर आहे. मंदिरात ९ फुट उंचीचा नंदी आहे. राजा गणपती देवा शिल्पकार रामाप्पा याच्या कामावर इतका खुश झाला होता की त्यानेच या मंदिराचे नाव रामाप्पा मंदिर असे ठेवल्याचे सांगितले जाते.

Avatar

RAHUL PATIL

All Posts

Latest News

“Cloud & Metaverse Summit 2023”; तं...

February 25th, 2023 International

Related Post

अजित पवार यांच्याकडे हजारो कोटी रुपयांची बेनामी संपत...

November 1st, 2021 | RAHUL PATIL

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हजारो कोटी रुपयांची बेनामी संपत्ती असल्...

जगातील सर्वाधिक सुरक्षित शहराच्या यादीत ‘महारा...

September 4th, 2021 | RAHUL PATIL

जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी समोर आली असून या यादीत भारतातील दोन शहरांचा समावेश आहे. तर, डेन्मार्कची राजधानी कोपेनह...

कोविशील्डचे उत्पादन 50 टक्क्यांनी कमी करणार; अदर पून...

December 8th, 2021 | RAHUL PATIL

देशात एकीकडे करोनाच्या नव्या व्हेरियंट म्हणजेच ओमायक्रॉनने जगाची चिंता वाढवली आहे. तर दुसरीकडे लसीकरणाचा वेग देखील वाढवण्य...