‘भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वतंत्र नसून ती भीक होती. खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळालं,’ असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना रनौत हिने केल आह.
या वादग्रस्त विधानाचं तीव्र पडसाद देशभारत पडत आहेत.
कंगनानं एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखत देताना असं बोलली.
‘दुर्दैव हे आहे, व्यसनाच्या आहारी गेलेल्या नट-नट्यांनी काही तरी वक्तव्य करायचं, आणि प्रसार माध्यमांनी त्यांना आफाट प्रसिद्ध त्यांची स्वातंत्र्य सारख्या पवित्र आणि मोठ्या गोष्टीबद्दल कंगना रनौतसारख्या बाईनं असे वक्तव्य करण्याची औकात आहे का ?, हे आधी तपासून पहावे,’ अशा कठोर शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माध्यमांनी बोलताना टीका केली.
‘भगतसिंग पासून ते नेताजी सुभाष चंद्र बोस पर्यंत स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी हुतात्मे पत्करले, त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर महात्मा गांधींनी देखील देश एक केला होता, आणि कंगना रनौतसारख्या एखाद्या नटीने अशा पद्धतीचे वक्तव्य करणे म्हणजे हा स्वातंत्र्याचा नाही तर संपूर्ण देशाचा अपमान आहे,’ असे माझं स्पष्ट मत असल्याचं शेट्टी म्हणाले.
कंगना रनौत नेमकं काय म्हणाली ?
‘स्वातंत्र्य जर भीक म्हणून मिळालं असेल तर ते स्वातंत्र्य असेल का? सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस या लोकांबाबत बोलायचं झाल्यास, या सर्वांना माहित होतं की रक्त सांडलं तर हे लक्षात ठेवावं लागेल की, हे आपल्या भारतीयांचं नसेल.
त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण ते स्वातंत्र्य नव्हतं. भीक होती. खरं स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळालं. ‘