पंतप्रधान नरेंद्र मोदी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भारताच्या सिरम इंस्टीट्युटचे सीइओ अदर पुनावाला हे टाइम मॅगझीननुसार २०२१ वर्षातील, जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत आले आहे. बुधवारी टाइम मॅगझीनने सादर केलेल्या वर्षभरातील जगातील १०० सगळ्यात प्रभावशाली असणाऱ्या लोकांची यादी जारी केली. त्यात जगभरातील नावाजलेल्या लोकांपैकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, प्रिन्स हॅरी आणि मेगन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, आणि तालिबानच्या नवीन घोषित काळजीवाहू सरकारमध्ये उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरदार . टाइम नुसार भारताच्या स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्षापर्यंत भारतात असलेल्या प्रमुख नेत्यांपैकी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी हे भारताच्या राजकीय क्षेत्रातील तिसरे प्रभावशाली व्यक्ती आहेत. ममता बॅनर्जी या फक्त त्रिनमुल काँग्रेसच्या प्रमुख नसून त्या स्वतःच खुद्द एक पार्टी आहेत.
त्या लढवय्या आहेत आणि स्वबळावर पितृसत्ता असलेल्या संस्कृतीचला मोडणाऱ्या आहेत.४० वर्षीय पूनावाला यांनी सुरुवातीपासून कोरोना काळात सर्वात जास्ती लसीचे निर्माते आहेत.
कोरोना अजूनही संपलेला नाही आणि पूनावाला हे अजूनही मदत करत आहेत. शांतता करार दरम्यान मुल्ला बरदार यांनी अमेरिकेबरोबर वाटाघाटीत तालिबानचे नेतृत्व केले. तो खूप गुप्त गोष्टी ठेवणारा माणूस मनाला जातो.
तो तालिबान मधील प्रतिनिधित्व करतो. २०१० मध्ये, बरदरला पाकिस्तानच्या देशाच्या सुरक्षा दलांनी अटक केली आणि २०१८ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तान सोडण्याच्या प्रयत्नांना तीव्र केले तेव्हा त्याची सुटका झाली.या लिस्ट मध्ये टेनिस खेळाडू नाओमी ओसाका, रशियन एक्टिविस्ट अलेक्सि, गाण्याच्या इंडस्ट्रीतील मोठे नाव ब्रिटनी स्पेयर्स, आशियाई पॅसिफिक पॉलिसी आणि प्लॅनिंग कौन्सिलचे डायरेक्टर मंजुषा पी. कुलकर्णी, अँपलचे सीईओ टीम कूक, अभिनेत्री केट विन्स्लेट आणि पहिली अफ्रिकन आणि वर्ल्ड ट्रेड ओर्गनासिएशनच्या मुख्य इंगोझी इवेला सामील आहेत.