आज साखळी उपोषणाचा पाचवा दिवस
वर्धा/हिंगणघाट: आर. एस.एस. मोहता मिल हिंगणघाट येथील मिलमध्ये अनेक वर्षापासून बरेच कामगार कार्यरत आहे. उपजीवीकेचे मुख्य साधनच मिलमध्ये असलेली नोकरी आहे. भारत सरकारने आमची शेकडो एकर शेती कवडीमोल भावाने मिल मालकाला दिली व करोडो रुपयाचे कर्ज देण्यात आले. परंतु मिल मालक व प्रशासनाने हजारो करोडो रुपयाचा घोटाळा करुन मिल दि. ६ मे २०२१ पासून कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता मिल बंद करुन सर्व पैसे बुडविले व जमीन हडपण्याच्या प्रयत्नात आहे. मिल बंद असल्याने मजुरावर उपासमारीची वेळ आली आहे.
राष्ट्रीय मिल मजदूर संघटनेकडे हायकोर्टाचा आदेश असून सुध्दा मार्च व एप्रिलचा पगार दिलेला नाही व २०२०-२१ चा बोनस सुध्दा दिलेला नाही. म्हणजेच मिल प्रशासन कोर्टाची अवहेलना करीत आहे. करीता आम्ही मिल मजुर झालेल्या अत्याचाराविरुध्द उपोषणाला बसण्यासाठी एस. डी. एम. हिंगणघाट येथे परवानगी मागितली आहे. आज आमच्या साखळी उपोषणाचा पाचवा दिवस असल्याचे प्रतिनिधीस मंजूरांनी सांगितले.
प्रशासन आम्हाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करीत नसून आम्हाला संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकाराचे हनन होत आहे. तरी संबंधीत अधिका-यावर मुलभुत हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत कार्यवाही करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. तसेच मिल प्रशासनाची आर्थिक गैरव्यवहाराबाबत चौकशी करून, ई.डी. चौकशीसाठी तक्रार दाखल करावी. अन्यथा उपोषणा दरम्यान मिल मजुराना जिवित वित्त व कुठल्याही प्रकारची हानी झाल्यास त्यासाठी प्रशासन जबाबदार असेल असे प्रमुख मागण्यासह मिल मजदूर संघटनेनी सांगितले.