नागपूर: केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी बुधवारी ग्रामीण भागात पोषण जागरूकता, शिक्षण आणि गावातील वर्तणुकीतील बदलांना चालना देण्याच्या उद्देशाने संपूर्ण भारतातील ७५ गावांपर्यंत पोहोचण्यासाठी “न्यूट्रिशन स्मार्ट व्हिलेज” (Nutrition Smart Village) कार्यक्रमाची घोषणा केली.
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने (Ministry of Agriculture and Farmers Welfare) सांगितल्यानुसार, उपक्रमाची उद्दिष्टे ग्रामीण भागात पोषण जागरूकता, शिक्षण आणि गावातील वर्तणुकीतील बदलांना प्रोत्साहन देणे आहे.
ज्यामध्ये शेतकरी महिला आणि शाळकरी मुलांचा समावेश राहणार आहे.
कुपोषणावर मात करण्यासाठी स्थानिक कृतीद्वारे पारंपारिक ज्ञानाचा उपयोग करणे आणि पोषण-संवेदनशील शेतीची अंमलबजावणी करणे तसेच घरातील शेती आणि पोषण-बाग याची जागरूकता पसरवणे आहे.
कार्यक्रमाची उद्दिष्टे भुवनेश्वर येथील समन्वय संस्था व्यतिरिक्त भारतातील १२ राज्यांमधील १३ केंद्रांवर कार्यरत असलेल्या ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट ऑन ऍग्रीकल्चर (AICRP-WIA) च्या नेटवर्कद्वारे साध्य केली जातील.
“पंतप्रधानांनी सर्व शिक्षणतज्ज्ञ, कृषी शास्त्रज्ञ आणि सर्व संस्थांना ७५ गावे दत्तक घेण्याच्या आणि परिवर्तन करण्याच्या आवाहनाच्या अनुषंगाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. उपक्रमांतर्गत, एकूण ७५ गावे एआयसीआरपी (AICRP) केंद्रे आणि ICAR-CIWA द्वारे दत्तक घेतली जातील, ज्यासाठी एआयसीआरपी (AICRP) केंद्रे प्रत्येकी ५ गावे दत्तक घेतील आणि उर्वरित ICAR-CIWA द्वारे दत्तक घेण्यात येणार आहेत. यामुळे ७५ न्यूट्री-स्मार्ट गावे विकसित करण्याच्या उद्देश आहे “, असे निवेदनात म्हटले आहे.
कुपोषणमुक्त गावांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, पोषण अभियानाला बळकटी देण्यासाठी पोषण- गावे/पोषक-अन्न/पोषण-आहार/पोषण-थाळी इत्यादी संकल्पनांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी जनजागृती मोहीम आणि क्षेत्रीय उपक्रम हाती घेतले जातील. महिला शेतकर्यांमध्ये त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबतही समाजाच्या सर्व क्षेत्रातील जागरुकता निर्माण केली जाईल. एआईसीआरपी (AICRP) केंद्राद्वारे विकसित उत्पादने/साधने/तंत्रज्ञानाचे विविध ठिकाणी चाचण्यांद्वारे मूल्यमापन केले जाईल,” असेही ते पुढे म्हणाले