शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कधी एकत्र होऊ शकत नाही मग सेना आणि काँग्रेस कशी एकत्र होणार. असे म्हटले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. असे विधान शिवसेना नेते अनंत गीते यांनी केले आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी शरद पावर यांच्यावरही निशाना साधला आहे. शरद पवार हे आमचे नेते होऊच शकत नाहीत. एकत्र येऊन आघाडी सरकार स्थापन करणे म्हणजे सत्तेसाठी तडजोड होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच मुळी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. असे वक्तव्य गीतेंनी केले आहे. यामुळे उपस्थित आघाडी कार्यकर्त्यांच्या भूवया उंचावल्या होत्या. या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
२०१९ साली झालेल्या रायगड लोकसभेत राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी ४ लाख ८६ हजार ९६८ मते मिळवून शिवसेनेचे अनंत गीते यांना पराभूत केले होते. तर अनंत गीते यांना ४ लाख ५५ हजार ५३० मते मिळाली होती. हा पराभव जिव्हारी लागल्याने तेव्हापासून अनंत गिते अज्ञात वासात होते.
काही दिवसांपूर्वीच त्यांनी राजकारणात दमदार एंट्री केली आहे. मागच्या आठवड्यात चिपळून येथील कुणबी मेळाव्यात गीते यांनी राजकारणात मी पुन्हा सक्रीय होणार असल्याची घोषणा केली होती. मी खासदार नसलो तरी राजकारणाला विराम दिलेला नाही असे गीते म्हणाले होते.