आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन जगातील लोकशाही स्थितीचा आढावा घेण्याची संधी प्रदान करतो.
केव्हा सुरू झाला?
2007 मध्ये युएन जनरल असेंब्लीने लोकशाहीच्या प्रोत्साहन व एकत्रिकरणा संदर्भातील राष्ट्रीय कार्यक्रमांना बळकट करण्यासाठी हा ठराव जाहीर केला. 2008 मध्ये प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आला.
लोकशाहीचे सूत्र : समानता आणि स्वातंत्र्याद्वारे सार्वजनिक जीवनात शांती पसरावी हा लोकशाहीचा हेतू असतो. लिंग, जात, धर्म या सर्वापेक्षाही मानवता महान असते, हेच लोकशाहीचे सूत्र आहे.
लोकशाही म्हणजे : लोकांची सत्ता. लोकसत्ताक राज्याला इंग्रजीत ‘डेमोक्रसी’ हा प्रतिशब्द आहे व तो ग्रीक शब्द ‘डेमोज’ म्हणजे लोकं आणि ‘क्रेटीन’ म्हणजे राज्य करणे, यावरून अप्रभ्रंशित झाला आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकशाही बद्दल विचार :
★ लोकशाहीचे रूप सतत बदलत असते. तिची वाढ आपोआप होत नसते. लोकशाहीची वाढ योग्य दिशेने व योग्य पद्धतीने होण्यासाठी तिची मशागत करावी लागते.
★ लोकशाही यशस्वी होणे आवश्यक असेल तर तिचा पाया चांगल्या सामाजिक संबंधावर अधारलेला पाहिजे. दारिद्र्यता, निरक्षरता व जातिभेद नष्ट केल्यासच लोकशाही बळकट होईल.
★ समाजात खास अधिकार असलेल्या व खास अधिकार नसलेल्या लोकांतील फरक हा लोकशाहीशी विसंगत असतो, किंबहुना तो लोकशाहीस हानीकारक असतो.
★ समाजातील या दोन वर्गात असलेल्या विरोधाचा परिणाम व्यवहारात अत्यंत प्रतिकूल होतो. म्हणूनच वर्गीय समाज रचना ही यशस्वी लोकशाहीस मारक असल्याने तिचा धिक्कार केला पाहिजे.
आजच्या दिवसाचे महत्व : आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाद्वारे जगातील लोकशाही बाबतच्या स्थितीचा आढावा घेण्याची संधी प्राप्त होते.