कोरोना महामारीच्या दुसरी लाटेनंतर आता देशाची अर्थव्यवस्था परत रुळावर येत आहे. केंद्र सरकार अर्थव्यवस्थेला अजून समोर नेण्याकरिता नव-नवीन योजना सुरु करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२१ ला लाल किल्लावरून भाषण देतांना शक्ती योजनेची घोषणा केली होती. आता १० लाख करोड रुपयांची हि योजना अजज १३ ऑक्टोबर २०२१ ला लाँच केली जाईल. या योजनेच्या अनुषंगाने देशात रोजगार वाढतील. अशी अशा वर्तविली जाते कि, ह्या योजनेमुळे देशातील मास्टर प्लॅन आणि इन्फ्रास्टक्चर मजबूत होण्यास मदत होईल.
देशात पायाभूत सुविधा मजबूत व्हायला आज बुधवारी मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिसाठी राष्ट्रीय मास्टर प्लॅन म्हणजे पीएम गती शक्ती योजनेला प्रारंभ झाला आहे. देशात अनेक ठिकाणी रस्ते तयार दिवसांनंतर केबल टाकण्यासाठी किंवा इत्तर कामासाठी रस्ते खोदले जातात. वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी न मिळाल्याने या शेकडो- हजार कोटी रुपये खर्चूनहि अनेक प्रकल्प थांबले जातात. पीएम शक्ती योजनेच्या माध्यमातून अशा अनेक समस्या सोडविल्या जातील.
पीएम गती शक्ती योजनेमध्ये १६ मंत्रालयाचा एक गट तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये रेल्वे परिवहन,जहाज बांधणी, माहिती आणि तंत्रज्ञान, कापड, पेट्रोलियम, ऊर्जा, नागरी उद्याण, दूरसंचार, यासारख्या मंत्रालयांच्या या गटात समावेश आहे. या मंत्रालयांतर्गत जे प्रकल्प सूरु आहेत किंवा २०२४-२५ पर्यंत ज्या योजना पूर्ण करायच्या आहे त्या सर्व प्रकल्पांचा समावेश पीएम गती शक्ती योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे.