भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांना आरएसएसच्या शाखेला भेट देऊन तिथे होणाऱ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी निमंत्रण दिलं. कुमारस्वामी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या वक्त्याव्यावरून राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली.
कुमारस्वामी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत म्हंटले की, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमधून शिकण्यासारखं काही नसून तिथे प्रशिक्षण घेणारे लोक अधिवेशनादरम्यान विधानसभेत ब्ल्यू फिल्म्स पाहत असतात’, यामुळे सध्या एकच चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले कुमारस्वामी ?
“मला आरएसएसची सोबत नको आहे. आरएसएसच्या शाखांमध्ये काय शिकवलं जातं हे आपण पाहिलं नाहीये का? विधानसभेत कसं वागाव. अधिवेशन सुरु असताना ब्ल्यू फिल्म्स पाहत असतात. आरएसएसच्या शाखेत त्यांना (भाजपाला) हीच गोष्ट शिकवली जात नाही का? हे शिकवण्यासाठी मला आरएसएस शाखेत जाण्याची गरज आहे का?,” अशी विचारणा कुमारस्वामी यांनी केली आहे.
कुमारस्वामी २०१२ मधील एका घटनेचा संदर्भ देत बोलत होते जेव्हा भाजपाच्या तीन मंत्र्यांना अधिवेशनादरम्यान मोबाइलमध्ये पॉर्न व्हिडीओ पाहताना पकडण्यात आलं होतं. याप्रकरणी तीन मंत्र्यांनी राजीनामा दिलाही होता. तसेच याआधी केंद्रात आणि कर्नाटकात भाजपा सरकार आरएसएस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांगण्यानुसार