वर्धा: समुद्रपूर तालुक्यातील नगर पंचायतीच्या उर्वरीत दोन प्रभागातील निवडणूक दि. १८ जानेवारी रोजी घेण्यात येणार असून, त्यासाठी नगर पंचायत समुद्रपूर सार्वत्रिक निवडणूक विभागामार्फत नेमणूक केलेल्या मतदान अधिका-यांचे पहिले प्रशिक्षण आज संपन्न झाले.
नगर पंचायत समुद्रपूर येथील सभागृहात आयोजित प्रशिक्षणास सकाळी ११.०० सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी – श्रीमती, शिल्पा सोनुले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल जगताप
नायब तहसिलदार सयाम साहेब यांनी उपस्थित मतदान अधिका-यांना याप्रसंगी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमानुसार मतदान केंद्रावर करावयाची कामे यासंदर्भात मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणास आलेल्या सर्वच मतदान अधिका-यांच्या मतदानासंदर्भात असलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. आवश्यक बाबींची पूर्तता करून मतदान योग्यरित्या पार पाडण्याची जबाबदारी आपणावर असल्याचे जगताप यांनी यावेळी सांगितले.
दुपार सत्रात मतदान अधिका-यांना ईव्हीम यंत्र हाताळणी संदर्भात प्रशासकीय अधिकारी पवन धुमाळे कनिष्ठ अभियंता अखिलेश सोनटक्के यांनी सर्वंकष माहिती समजवून मार्गदर्शन केले. मशीनबाबत असलेल्या सर्व समस्या कशा सोडवाव्यात याचीही माहिती प्रत्यक्षपणे सांगितली. दुसरे प्रशिक्षण दि. १२ जानेवारीला नगर पंचायत सभागृह समुद्रपूर येथे होणार असल्याचे निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
मतदान अधिकारी म्हणून विशाल केदार, राहुल पाटील, नेहरोत्रा सर, भोयर सर, मोरारजी राठोड, योगेश पेठकर, भलावी, वालदे, उपस्थित होते. यावेळी तलाठी- सुरजूसे सर, लिपिक अक्षय पुनवटकर, लिपिक श्रीकांत आगलावे, लिपिक गुणवंत बोरकुटे, लिपिक भावना ठाकरे, शिपाई पुष्पा पांडे, मंगेश मेंधुले व विजय घुकसे यांनी प्रशिक्षण यशस्वी होण्यास सहकार्य केले.