दोन पत्रकारांना यंदा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मारिया रेसा (फिलीपाईन्स) आणि दिमित्री मुरातोव्ह (रशिया) अशी त्यांची नावे आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी या पत्रकारांनी जो लढा दिला आहे त्याच्या गौरवार्थ त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
नोबल पुरस्कार समितीचे ब्रिट रेईस अँडरसन यांनी आज ओस्लोतील पत्रकार परिषदेत हे पुरस्कार जाहीर केले. सध्या नोबेल पुरस्कार टप्प्याटप्प्याने जाहीर केले जात आहेत. शांततेचा नोबल पुरस्कार जगात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. तो कोणाला मिळणार याची मोठी उत्सुकता असते. आज दोन पत्रकारांची नावे या साठी जाहीर झाली.
राज्यकर्त्यांच्या विरोधात अभिव्यक्तीस्वातंत्र्यांचा गजर कायम ठेऊन निर्भीड पत्रकारीतेचे दर्शन घडवत या दोन पत्रकारांनी शांततेचा पुरस्कार केला आहे असा या पत्रकारांचा गौरव नोबेल समितीने केला आहे.