नागपूर: चीन येथून परत एक भयानक प्रकार समोर येतो आहे. एका रांगेत मेटल बॉक्स प्रकारातील घरांमध्ये कोरोनाने बाधित असलेल्या रुग्णांना अक्षरशः डांबून ठेवण्यात आल्याचे दृश्य समोर येत आहे. त्यात त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढू नये याकरिता थेतील शासनाने हा निर्णय घेतला आहे. चीनने त्यांच्या कठीण कायद्याप्रमाणे “झिरो कोविड पॉलिसी” म्हणजे शहरात कोरोनाचे शून्य रुग्ण करण्याकरिता हि पॉलिसी आखली आहे. बीजिंगने पुढील महिन्यात होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची तयारी करत असतानाही चीनने आपल्या “शून्य कोविड” धोरणाखाली आपल्या नागरिकांवर अनेक कठोर नियम लादले आहेत, लाखो लोकांना विलगीकरणात ठेवले जात आहे.
यात गर्भवती महिला, लहान मुले, वयोवृद्ध याना बळजबरीने त्या मेटल बॉक्स प्रकारातील असणाऱ्या घरांमध्ये डांबण्यात येत आहे. तेथे लाकडाचा पलंग आणि प्रसाधनगृहाची सुविधा आहे. कोरोनाने बाधित असलेल्या रुग्णांना दोन ते तीन आठवडे ठेवले जात आहे. एक जरी माणूस कोरोनाने पॉसिटीव्ह निघाला तरी त्याला अशा प्रकारे डांबले जात आहे. काही क्षेत्रात तर रातोरात लोकांना स्वतःचे घर सोडून विलगीकरण सेंटरला जाण्याचे आदेश दिले जात आहेत.
चीनमध्ये ट्रक-अँड-ट्रेस अँप च्या मदतीने कोरोना तपासून विलगीकरणात टाकण्यात येईल. जवळजवळ २० दशलक्ष लोकांना घरातून बाहेर निघण्यास मनाई आहे. ते अन्न किंवा इत्तर वापरण्याच्या गोष्टी देखील आणायला बाहेर पडू शकत नाही. ते त्यांच्या स्वतःच्याच घरात डांबले गेले आहे, असे एका वृत्ताने सांगितले आहे.