1. Covid-19 cases on January 31: India reports 80 new, just 6 active cases 2. IMF projects Indian economy to grow 6.1% in 2023, global growth to dip to 2.9% 3. Delhi CM Arvind Kejriwal receives death threat, accused nabbed 1. 31 जानेवारी रोजी कोविड-19 प्रकरणे: भारतात 80 नवीन, फक्त 6 सक्रिय प्रकरणे नोंदवली गेली 2. IMF 2023 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6.1% वाढेल, जागतिक वाढ 2.9% पर्यंत घसरेल असा अंदाज 3. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपी पकडला

महाराष्ट्रातील जागतिक वारसा वास्तूंचे संवर्धन केल्याने युनेस्कोचा पुरस्कार

UNESCO

नागपूर- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि भायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा (UNESCO) पुरस्कार मिळाला आहे. आशिया पॅसिफिक अॅवॉर्ड्स फॉर कल्चरल हेरिटेज कॉन्झर्व्हेशन २०२२ (Asia-Pacific Awards for Cultural Heritage Conservation programme 2022) परिषदेत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाला (Chhatrapati Shivaji Maharaj Museum) ‘अवॉर्ड ऑफ एक्सलन्स’ (Award of Excellence) हा पुरस्कार देण्यात आलाय, तर भायखळा स्थानकाला (Byculla Station) आशिया पॅसिफिक ऑफ मेरिट पुरस्काराने (Asia Pacific of Merit) गौरवण्यात आले आहे.

फोर्ट येथील काळा घोडा येथे असणारे छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाने (Chhatrapati Shivaji Maharaj Museum) विसाव्या शतकातील काँक्रीटसारख्या सामग्रीचा वापर न करता पारंपरिक कारागिरीचा वापर करत संग्रहालय उत्तम ठेवले आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे कार्यान्वित केलेला हा प्रकल्प जागतिक वारसा वास्तूंच्या संवर्धनाच्या दृष्टीने केवळ भारतच नव्हे तर त्याहूनही पुढे जाऊन आदर्श निर्माण करणारा आहे, असं युनेस्कोच्या पुरस्काराच्या वाचनात म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाची शताब्दी १० जानेवारी २०२२ रोजी झाली. या शताब्दी वर्षानिमित्त २०१९ पासूनच नुतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली होती. यामध्ये संपूर्ण इमारीतीची व्यापक दुरुस्ती करण्यात आली. मुख्य घुमटाचीही दुरुस्ती करण्यात आली होती. तसंच, संग्रहालयाचा जीर्णोद्धारासाठी टप्प्याटप्य्यामध्ये कामे करण्यात आली. लॉकडाऊन काळातही संग्रहालयाची कामे पूर्ण करण्यात आली.

मध्य रेल्वेवरील भायखळा हे रेल्वे स्थानक १६९ वर्षे जुने आहे. या स्थानकाला युनेस्को आशिया पॅसिफिक ऑफ मेरिट हा पुरस्कार मिळाला आहे. २६ नोव्हेंबर रोजी बँकॉकमध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. भायखळा स्थानकाच्या प्राचीन वास्तूचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काम हाती घेतले होते. प्रसिद्ध वास्तुविशारद आभा लांभा आणि बजाज ट्रस्टने सामाजिक दायित्व निधी अंतर्गत आय लव्ह मुंबई हा प्रकल्प साकार केला. १८ महिन्यांत या स्थानकाच्या खिडक्या, फसाड, प्रवेशद्वाराचे काम करण्यात आले. या प्रकल्पासाठी चार कोटींचा खर्च करण्यात आला होता.

 

RENUKA KINHEKAR

RENUKA KINHEKAR

All Posts

Latest News

Related Post

टाटा कंपनीचा पुढाकार ; कर्मचाऱ्यांना दिला मदतीचा हात

November 22nd, 2022 | Nita Sonwane

नागपूर- मागील महिन्यात निरनिराळ्या देशामधील विविध कंपन्यांनी शेकडो लोकांना कामावरून काढले आहे. जागतिक मंदीच्या फटक्याचे पड...

IAS अधिकारीला सॅनिटरी पॅड्सची विचारणा करणाऱ्या रियाल...

October 4th, 2022 | RENUKA KINHEKAR

नागपूर: IAS अधिकारी हरजोत कौर यांच्याकडे सॅनिटरी पॅडची मागणी करणाऱ्या पाटणाच्या कमला नेहरू नगरमध्ये राहणाऱ्यारिया कुमारीला...

‘भारतीय मुलीचा बुद्ध्यांक आइनस्टाइनपेक्षा अधिक...

October 26th, 2021 | RAHUL PATIL

भारतीय बुद्धिमत्तेचा सध्या माहिती – तंत्रज्ञान क्षेत्रासह जगभरात बोलबाला आहे. ब्रिटनमधील एका १२ वर्षीय मुलीचा बुद्ध्यांक प...