नागपूर: अखिल भारतीय धर्म संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुकदेवजी महाराज यांनी केद्रींय मंत्री नितिनजी गडकरींच्या सदिच्छा भेटी प्रसंगी संत रविदास महाराज प्रतिमा देऊन संन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्यांचे अध्यक्ष संजय खामतकर तसेच राष्ट्रीय सचिव विठ्ठल जावदे यांनी संत रविदास महाराज यांचे प्रचार, प्रसारा विषयी विश्वात चाललेले अखिल भारतीय रविदासीया धर्म संघटनच्या माध्यमातून सविस्तर चर्चा झाली.
संत रविदास महाराज तिसरे धाम कात्रज विकास व विस्तार होणे बाबत. सुकदेवजी महाराज यांच्या सुरक्षा बाबत. संत रविदास महाराज यांचे महाराष्ट्रात होणारे विश्व साहित्य संमेलन. संत रविदास महाराज तिसरे धाम वर्धापन दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती निमंत्रण. संत रविदास महाराज यांचे महाराष्ट्रात विश्वविद्यालय स्थापना संदर्भात सविस्तर चर्चा झाली. वरील विषयाच्या अनुषंगाने अखिल भारतीय धर्म संघटनच्या समिती समवेत सकारात्मक चर्चा करून निवेदन देण्यात आले.
नितिन गडकरी यांनी समितीस महत्वपूर्ण एक तास चर्चा करतांना मार्गदर्शन व युवकांनी विविध स्तरातील जागतीक बाजारपेठेचा अभ्यास करावा व तांत्रिक प्रशिक्षण घेवुन सुक्ष्म लघु उद्योगाकडे तसेच लेदर इंड्स्ट्री मध्ये आपले कर्तृत्व सिध्द करावे. याकरिता शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा. माझे याकरिता नेहमीच मार्गदर्शन व सर्वोतोपरी मदत करण्याचे अश्वासन दिले.
अखिल भारतीय रविदासीया धर्म संघटनच्या कार्याची प्रशंसा करतांना अभिनंदन करुन समितीच्या कार्याला शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी खालील पदधिकांऱ्याची प्रमुख उपस्थिती नाना बसेशंकर, फुलचंद मालाधरी, मधुकर चापके, राजेश आंबोलकर, अशोकराव भागवत कर, योगेश पाचपोर, प्रा.भगवान गायकवाड, दिपक कांबळे, दिनेश सोनेकर यांची उपस्थिती होती.