नागपूर: वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या आणि एजन्सींनी उत्तर प्रदेश निवडणुकीसंदर्भात एक्झिट पोल जारी केले. यापैकी ११ सर्वेक्षण अहवालांमध्ये राज्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे. केवळ देशबंधूंच्या एक्झिट पोलमध्ये समाजवादी पक्ष युतीचे सरकार स्थापन करणार असल्याचे म्हटले आहे. आता आणखी एका सर्वेक्षणात राज्यात सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
4-PM आणि The Politics.in च्या सर्वेक्षणानुसार यावेळी अखिलेश यादव राज्यात सरकार स्थापन करण्यात यशस्वी होतील असा अंदाज आहे. सर्वेक्षणानुसार समाजवादी पक्षाला 238 जागा मिळू शकतात, तर 157 जागा भाजपच्या खात्यात जातील. बसपाला सहा आणि काँग्रेसला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. एक जागा इतरांच्या खात्यातही जाऊ शकते.
2017 च्या तुलनेत भाजपच्या मतांची टक्केवारीही कमी होईल, असा सर्वेक्षणाचा अंदाज आहे. 2017 मध्ये भाजपला 39.67% मते मिळाली होती, जी यावेळी 32% पर्यंत खाली येतील. त्याच वेळी, SP च्या मतांचा हिस्सा 21.82% वरून 41% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
देशबंधूच्या सर्वेक्षणानुसार यावेळी समाजवादी पक्षाला 228 ते 244 जागा मिळू शकतात. त्याचवेळी भाजपला 134 ते 150 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेसला एक ते नऊ जागा, बसपला 10 ते 24 आणि इतरांना शून्य ते सहा जागा.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मोठा दावा केला आहे. अखिलेश म्हणाले, ‘लोक यावेळी डबल इंजिन सरकारचे ट्रॅक उखडून टाकण्यास तयार आहेत. सपा आघाडीला 300 जागा मिळण्याची खात्री आहे. दुसर्या ट्विटमध्ये अखिलेश म्हणाले, “सातव्या आणि निर्णायक टप्प्यात सपा-आघाडीला बहुमताच्या खूप पुढे नेल्याबद्दल सर्व मतदारांचे आणि विशेषत: तरुणांचे खूप खूप आभार! आम्ही सरकार बनवत आहोत.