पूर्वीच्या नकारघंटेला पूर्णविराम
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणुक लढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पक्षाची संमती असल्यास निवडणूक लढण्यास तयार असल्याचे जाहिर केले. आजमगढ लोकसभा मतदार क्षेत्राचे खासदार अखिलेश यादव यांनी याआधी निवडणूक न लढण्याचे जाहीर केले होते. 1 नोहेंबर रोजी पीटीआय ने अखिलेश यादव निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. अखिलेश यादव म्हणाले होते की, “मी उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणूक स्वत: लढणार नाही. परंतु आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी नकारघंटेला पूर्णविराम देत निवडणूक लढणार असल्याचे सांगितले.
अखिलेश यादव म्हणाले की “मी मोठ मोठ्या निवडणुका लढवलेल्या आहेत. समाजवादी पार्टी आणि आमच्या लोकांनी ठरवल तर निवडणूक लढवणारच”. कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार असे विचारले असता समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, “समाजवादी पार्टी जे क्षेत्र ठरवेल किंवा ज्या क्षेत्रातील लोक बोलावतील त्या क्षेत्रातून निवडणूक लढवनार”.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणुक लढण्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री योगी म्हणाले की स्वत: विधानसभा निवडणुक लढवणार आणि राज्यात 300 पेक्षा जास्त उमेदवार येऊन पुन्हा सत्ता स्थापन करणार. मुख्यमंत्री योगी म्हणाले की पक्ष जिथून म्हणेल तिथून निवडणुक लढणार. मुख्यमंत्री योगी म्हणाले की भाजप हा एक मोठा राजकिय पक्ष आहे. या पक्षात नेत्यासा कधी सरकारची तर कधी संघटक पदाची जबाबदारी दिली जाते.
नविन वर्षाच्या निमित्ताने पत्रकारांनी अयोध्या, गोरखपुर, देवबंद आणि कैराना येथून निवडणुक लढवनार का ? असे विचारले असता म्हणाले की मी विधानसभेच्या 403 जागांवर लढत असून पक्ष म्हणेल तेथून निवडणूक लढण्यास तयार आहे. त्यांनी स्पष्ट म्हटले की मी स्वत: विधानसभा निवडणूक लढवनार आणि राज्यात 300 पेक्षा उमेदवार निवडूनही आणणार.