नागपूर: भारताने आज १६ मार्च २०२२ पासून १२-१४ या वयोगटातली मुलांची कोरोनाच्या विरोधात लसीकरणाची सुरुवात केली आहे. तसेच आजपासून 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना प्रीकॉशनरी डोज घेण्यासाठी सह-विकाराची अट देखील (condition of co-morbidity) काढून टाकण्यात आली आहे आणि आता 60 वर्षांवरील प्रत्येकजण बूस्टर शॉट घेऊ शकतात.
कोरोनाच्या विरोधात लढा द्यायला १२ ते १४ वयोगटातील मुलांना देण्यात येणाऱ्या लसीचे नाव कॉर्बेव्हॅक्स (Corbevax )असून याची मॅनीफॅकचरिंग बायोलॉजिकल इव्हान्स, हैदराबाद येथील आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जे पण लोक लसीकरणाकरिता पात्र आहे त्यांना लसीचे डोज घेण्याकरिता आवाहन केले आहे.
कॉर्बेव्हॅक्स (Corbevax) हि भारतात कोरणाविरोधी लढा देण्याकरिता दिली जाणारी तिसरी लस आहे आणि हि लस सर्व केंद्रांवर उपलब्ध असेल.
मंगळवारी, केंद्राने १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या कोविड-१९ लसीकरणासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. बायोलॉजिकल ईच्या इंट्रामस्क्युलर लस कॉर्बेव्हॅक्सचे दोन डोस 28 दिवसांच्या अंतराने दिले जातील, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.
14-15 वयोगटातील लाभार्थी 15-18 वयोगटातील लसीकरण दरम्यान आधीच कव्हर केले गेले आहेत, केंद्राने मंगळवारी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून कोर्बेव्हॅक्स लसीचा पुरवठा झाल्यानंतर नागपूर शहरात १२ ते १४ वयोगातील मुलांसाठी लसीकरण अभियान सुरु करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दिली.
नागपूर महानगरपालिकेला बुधवारपर्यंत कोर्बेव्हॅस लसीचा पुरवठा होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. मनपाकडे लस उपलब्ध झाल्यानंतर योग्य नियोजन करून या वयोगटातील मुलांना लस दिली जाईल. १ जानेवारी २००८ ते १५ मार्च २०१० दरम्यान जन्मलेल्या मुले/मुलींना ही लस देण्यात येईल.
केंद्र शासनाकडून मान्यताप्राप्त कोर्बेव्हॅक्स लसीचे दोन डोस दिले जातील. दोन्ही डोस दरम्यान ४ आठवड्यांचे अंतर असणे आवश्यक आहे. याबाबत शाळांसोबत सुद्धा चर्चा करण्यात आली असून मनपा प्रशासनाने यासंबंधात तयारी सुरु केली असल्याचेही अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी सांगतिले.
कोर्बेव्हॅस लस उपलब्ध झाल्यानंतर १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण वेळेत आणि लवकर व्हावे यासाठी शहरातील शाळांनी मनपाच्या आरोग्य विभागात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेन्द्र बहिरवार, डॉ. गोवर्धन नवखरे, संबंधित झोनल वैद्यकीय आरोग्य अधिका-यांशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.