देशात मागील ११ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना कोणताही न्याय मिळालेला नाही. याचे पडसाद देशभर उमटत आहेत. भाजप खासदार वरुण गांधी यांनी शेतकरी आंदोलनाचे जाहीर समर्थन करत अलीकडे मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
वरुण गांधी यांनी देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणाचा काही भाग शेअर करून पक्षाला ‘आरसा’ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, जे भाजपचे सर्वोत्तम नेते मानले जातात. व्हिडिओमध्ये वाजपेयींनी तत्कालीन इंदिरा सरकारला इशारा दिला की शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न करू नका.
युपीतील पीलीभीतचे खासदार वरुण गांधी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या १९८० च्या भाषणाची एक छोटीशी क्लिप ट्विटरवर पोस्ट केली, ज्यात वाजपेयींनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आणि तत्कालीन इंदिरा गांधी सरकारला त्यांच्या दडपशाहीविरुद्ध इशारा दिला होता. गांधींनी ट्विट केले की, ‘मोठ्या हृदयाच्या नेत्याकडून सुज्ञ शब्द …’