1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘वीर सावरकरांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच दया याचिका दाखल केली होती’; राजनाथ सिंह

rajnath singh
Spread the love

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिंदुत्वाचे प्रतीक असणाऱ्या वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुंगात कैद असताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती असे मोठे वक्तव्य केले आहे. तसेच स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे योगदान काही विचारसरणीच्या लोकांनी बदनाम केले आणि ते आता सहन केले जाणार नाही, असेही मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन,या उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी राजनाथ सिंह बोलत होते. रूपा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये सावरकरांवरील पुस्तकाचे प्रकाशन करताना सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनीही मेळाव्याला संबोधित केले.

भागवत म्हणाले की, सावरकर कठोरपणे बोलले म्हणून लोकांचा गैरसमज झाला. पण जर संपूर्ण भारत त्यांच्यासारखे बोलला असता तर देशाला फाळणीला सामोरे जावे लागले नसते असा युक्तिवाद मोहन भागवत यांनी यावेळी केला. मोगल सम्राट औरंगजेब सारख्या व्यक्तींच्या नावावर रस्त्यांची नावे ठेवू नयेत या मताशीही ते सहमत होते असेही भागवत म्हणाले.

“सावरकरांच्या विरोधात खूप खोटे बोलले गेले आहे. त्यांनी ब्रिटिश सरकारपुढे अनेक दया याचिका दाखल केल्या हे वारंवार सांगितले गेले. त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी या याचिका दाखल केल्या नाहीत. सामान्यत: कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. तुम्ही दया याचिका दाखल करा, असे महात्मा गांधी म्हणाले होते. गांधींच्या सूचनेवरूनच त्यांनी दया याचिका दाखल केली. आणि महात्मा गांधींनी सावरकरांना सोडण्याचे आवाहन केले होते. गांधीजी ज्या प्रकारे आम्ही शांततेने स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत, सावरकर तेच करतील असे म्हणाले होते,” असे राजनाथ सिंह म्हणाले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचे आदेश

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसरकारच्या सर्व याचिका जानेवारीपासून ‘ई-फायलिंग’द्वारेच उच्च न्यायालयात सरकारच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्य...

    आज आंतरराष्ट्रीय ‘लोकशाही’ दिवस; डॉ. बाब...

    September 15th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआंतरराष्ट्रीय लोकशाही दिन दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.  आंतरराष्ट्रीय लोकश...

    संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर

    January 14th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात नवीन वर्षात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. राज्यसभेचे २५६ वे अधिवेशन ३...