केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. अनुपयुक्त वस्तू पासून उपयुक्त बनवलेल्या वस्तूला चालना देण्याकरिता विविध शहरांमध्ये बस,ट्रक, कार चालवायला ग्रीन हायड्रोजन वापरण्याला चालना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गुरुवारी सहाव्या राष्ट्रीय आर्थिक समावेशन परिषदेला संबोधित करताना गडकरी म्हणाले, “शहरांमधील सांडपाणी आणि घनकचरा वापरून तयार होणाऱ्या ग्रीन हायड्रोजनवर बस, ट्रक आणि कार चालवण्याची माझी योजना आहे.”
सांडपाण्यापासून काढलेल्या हायड्रोजनवर वाहने धावू शकतात यावर “लोकांचा विश्वास” निर्माण करण्याच्या प्रयत्नात केंद्रीय मंत्री म्हणाले, “मी एक पायलट प्रोजेक्ट कार घेणार आहे जी फरीदाबादमधील तेल संशोधन संस्थेने तयार केलेल्या ग्रीन हायड्रोजनवर चालेल. लोकांवर विश्वास बसावा याकरिता मी त्या गाडीत बसेन व शहरात फेरी मारेल…” असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी इतर पर्यावरण प्रोजेक्टविषयी देखील ते बोलले. यावेळी ते विविध सीएसआर प्रशिक्षण, शिक्षण घेतल्यावर व त्याच्या योजनांमुळे लोकांना कसे फायदे झाले ते देखील सांगितले.