राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात ‘ समस्या मुक्त गांव अभियान’ सुरु करण्यात येत आहे. गावातील सार्वजनिक समस्यांना सोडवण्यासाठी हा राज्यातील पहिलाच उपक्रम असणार आहे.
युवकांचा कल शहराकडे वाढत असल्यामुळे गावे ओसाड पडत आहे.गावात रोजगार, आरोग्य व्यवस्था, स्वच्छता, प्रशासकीय अडचणी, ७/१२ संबंधित विषय, वन जमिनीचे पट्टे, रस्त्याचे प्रश्न यांसारख्या अनेक समस्या असतात. जिल्ह्यातील प्रशासनाने एक दिवस एका गावाला देऊन सार्वजनिक स्वरूपाच्या समस्या तातडीने सोडवून गाव समस्यामुक्त करावे हे ध्येय पुढे ठेऊन उपक्रमाचा आजपासून शुभारंभ करत आहे. अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करत दिली आहे.
त्यामुळे आजपासून मंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्यात ‘समस्या मुक्त गाव अभियान’ चा शुभारंभ करणार आहेत. हे अभियान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित असल्याचेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.