1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

“हिंमत असेल तर…” विनायक राऊतांचे राणेंना थेट आव्हान

Spread the love

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबियांवरही टीका केली आहे. सिंधुदुर्ग येथे झालेल्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये विनायक राऊत यांनी नारायण राणेंना आणि त्यांच्या मुलांना येथील जनतेने अनेकदा पराभूत केल्याचा उल्लेख करतानाच हिंमत असेल तर पुढील विधानसभा येथून लढवून दाखवावी. डिपॉझिट जप्त झालं नाही तर नाव लावणार नाही.

नारायण राणेंना एकदा, तर त्यांच्या मुलांना दोनदा पराभूत केल्याचा उल्लेखही केला. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबियांवरही टीका केली आहे. सिंधुदुर्ग येथे झालेल्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये विनायक राऊत यांनी नारायण राणेंना आणि त्यांच्या मुलांना येथील जनतेने अनेकदा पराभूत केल्याचा उल्लेख करतानाच हिंमत असेल तर पुढील विधानसभा येथून लढवून दाखवावी. डिपॉझिट जप्त झालं नाही तर नाव लावणार नाही, असं थेट आव्हान दिलं आहे.

“नारायण राणेंनी हिमंत असेल तर पुन्हा वैभव नाईक यांच्यासमोर कुडाळ, मालवणमधून निवडणुक लढवून दाखवावी. नाही त्यांच डिपॉझीट जप्त केलं तर शिवसेनेचं नाव सांगणार नाही. हिंमत असेल तर रहा उभे विधानसभेला,” असं म्हणत राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला आहे. “सिंधुदुर्ग जिल्ह्याने नारायण राणेंना दाखवून दिलय दोनदा यांच्या पोराला आपटलं आणि एकदा यांना आपटलं,” असंही राऊत म्हणालेत. दिल्लीकरांना चांगलं वाटलं पाहिजे, मोदींना, अमित शाहांना चांगलं वाटलं पाहिजे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर राणे नको त्या शब्दात टीका करतात असा आरोपही यावेळी राऊत यांनी केला.

“सिंधुदुर्गात नारायण राणेंसारख्या गद्दारांची कधीचं डाळ शिजणार नाही. आजच नाही तर भविष्यातही कधी शिवसेनेच्या अंगावर आलात तर मर्द शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही,” अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एका जाहीर कार्यक्रमात नारायण राणेंवर केली आहे.

Claim Free Bets

कोकणामध्ये राणे विरुद्ध विनायक राऊत हा संघर्ष मागील बऱ्याच काळापासून सुरु आहे. चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगीही दोन्ही बाजूच्या नेत्यांची टोलवाटोलवी पहायला मिळाली होती.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    रामदास कदम यांना विधानभवनाच्या गेटवर अडवलं

    December 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या...

    Google Chrome, UI बदलामध्ये  करण्यायोग्य टूलबार शॉर्...

    May 3rd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: क्रोमचा इंटरफेस आणि लेआउट बदलण्याबाबत Google ऐतिहासिकदृष्ट्या खूप सावध आहे. एक मोठा बदल सानुकूल करण...

    तालीबानी भारतीय मुस्लिम समर्थकांवर नसरूद्दीन शहा भडकले

    September 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveचित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नसरूद्दीन शहा यांनी तालिबानचे समर्थन करणाऱ्या भारतीय मुस्लिमांना तालिबान...