1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

कर्णधारपद सोडणार विराट कोहली

virat kohli
Spread the love

भारतीय क्रिकेट विश्वातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी- 20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहली कर्णधारपद सोडण्याची शक्यता आहे.त्याच्या जागी रोहित शर्माकडे टीमचे नेतृत्त्व दिले जाऊ शकणार आहे. विराट बॅटींगवर मोठ्या प्रमाणात फोकस करण्याकरिता हा निर्णय घेऊ शकणार आहे.

विराट कोहली आणि टीम मॅनेजमेंट यांच्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाले आहे, असे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या दरम्यानच्या काळात यूएई आणि ओमानमध्ये टी- 20 वर्ल्ड कप होणार आहे. या विषयावर मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहली स्वत: हा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समन होण्याकरिता विराटला परत एकदा त्याच्या बॅटींगवर अधिक फोकस करण्याची इच्छा राहणार आहे. रोहित शर्माच्या कॅप्टनसीमध्ये मुंबई इंडियन्सने ५ वेळा आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. तर दुसरीकडे विराटच्या कॅप्टनसी मध्ये टीम इंडियाला आतापर्यंत एकदाही आयसीसीचे स्पर्धेत विजेतेपद मिळाले नाही. तसेच आयपीएल स्पर्धाही विराटला आजवर जिंकता आले नाही.

येणाऱ्या काळात आयसीसीच्या 3 वर्ल्ड कप स्पर्धा सलग तीन वर्ष होणार आहेत. येत्या महिन्यात यूएई आणि ओमानमध्ये टी वर्ल्ड कप होणार आहे. यानंतर पुढच्या वर्षी परत ऑस्ट्रेलियात एक टी- 20 वर्ल्ड कप T20 World Cup 2022 मध्ये होईल. यानंतर 2023 साली भारतामध्ये वन- डे वर्ल्ड कप होणार आहे. या स्पर्धांकरिता टीमची बांधणी करण्यासाठी रोहितला वेळ मिळावा याकरिता त्याला लवकरात लवकर कॅप्टन करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

Claim Free Bets
    THE FREE MEDIA

    THE FREE MEDIA

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    स्वीगी, झोमॅटो वरून जेवण मागवणे महाग होईल काय?

    September 18th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveपेट्रोल, डिझेलचा समावेश वस्तू आणि सेवा करात करण्याचा प्रस्ताव राज्यांनी फेटाळून लावल्यानं याबद्दल कोणताही न...

    मनपा नागपूर : महिलांसाठी आरक्षण सोडत जाहीर

    June 1st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: नागपुरातील महिलांसाठी राखीव असलेसल्या 50 टक्के जागांपैकी विविध प्रवर्गांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्...

    खरपुंडीतील सर्वे क्रमांक ५० ची जमीन सरकार दरबारी जमा...

    June 1st, 2022 | THE FREE MEDIA

    Spread the loveपत्रकार परिषद घेऊन खरपुंडी वासियांनी दिली माहिती गडचिरोली: शहरालगतच्या खरपुंडी ग्रामपंचायत येथील भू .क्र. ५...