बारावीनंतरच्या विविध सीईटीच्या तारखा जाहीर करतानाच अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापनासह राज्यातील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये 1 नोव्हेंबरपासून सुरू होतील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
येत्या 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी होतील. सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी एकूण 8 लाख 55 हजार 879 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या प्रवेश परीक्षांसाठी 226 केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. या परीक्षा झाल्यानंतर ही व्यावसायिक महाविद्यालये 1 नोव्हेंबरपासून सुरु होतील, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.
तब्बल 15हून अधिक प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक यंदा जाहीर झालेले नव्हते. परिणामी तब्बल आठ लाख विद्यार्थी वेटींगवर होते. अखेर मंगळवारी मंत्री सामंत यांनी सीईटींच्या तारखा जाहीर करत दिलासा दिला.
परदेश शिक्षणासाठी उत्पन्न अट कमी झाली..
खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी ङ्गगुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणेफ या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून रु.8 लाख इतकी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पूर्वी ही मर्यादा 20 लाख होती आता 8 लाख केल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.