1. Doha bound IndiGo flight diverted to Pakistan's Karachi due to a medical emergency onboard. 2. 'Naatu Naatu' from RRR wins the Oscar for the Best Original Song. 3. India's 'The Elephant Whisperers' wins Oscar award for the Best Documentary Short 1. मुंबई : कमला नगरमधील झोपडपट्टीत लागली भीषण आग.  2. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर 'फीडबॅक युनिट' या कथित स्नूपिंग प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालवण्यास गृह मंत्रालयाने दिली मंजुरी. 3. हरित ऊर्जेला मुख्य प्राधान्य देण्याच्या भारत सरकारच्या निर्णयामुळे खुश आहे: डेन्मार्कचे एन्व्हॉय.

पदवीधर शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान

Voting

नागपूर: महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक आणि अमरावती या पदवीधर तसंच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे.

राज्यात सत्तांतरानंतर पहिल्यांदाच विधान परिषदेची निवडणुक होत आहे. महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गट असा थेट सामना पुन्हा एकदा रंगणार आहे. नाशिक आणि नागपूर इथल्या मतदारसंघांमध्ये चुरस वाढली आहे. पहिल्या दिवसांपासून ते आतापर्यंत नाशिक मतदारसंघात नवनव्या घडामोडी पाहायला मिळत आहेत.

पदवीधर मतदार संघ
विधानपरिषदेच्या पाच जागांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली आणि सगळ्याचं लक्ष असलेली निवडणूक म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाची. काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या सुधीर तांबे यांनी अर्ज मागे घेतला आणि त्याच वेळी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला.

पक्षविरोधी भूमिका घेतल्याने काँग्रेसने सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांना निलंबित करण्यात आले. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघ

शुभांगी पाटील (अपक्ष)

सत्यजीत तांबे (अपक्ष)

धनराज विसपुते (अपक्ष)

धनंजय जाधव (अपक्ष)

तर अमरावतीमध्येही पदवीधर निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेस लढवत असून धिरज लिंगाडे हे रिंगणात आहेत. या पदवीधर मतदारसंघात भाजप, शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) आणि रिपाइं (आठवले गट) युतीचे उमेदवार डॉ. रणजित पाटील रिंगणात आहेत. त्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे.

शिक्षक मतदारसंघ

नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या समर्थनाने शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासमोर भाजप प्रणित आणि महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांचं आव्हान आहे.

तर कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शेकाप उमेदवार बाळाराम पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. इथे भाजपकडून ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही लढत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच, औरंगाबात शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप सामना पाहायला मिळेल. गेली कित्येक वर्षे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. त्यामुळे यावेळी देखील हा मतदारसंघ आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहेत.

तर दुसरीकडे भाजपकडून देखील हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या किरण पाटील यांना भाजपकडून रिंगणात उतरवण्यात आलं आहे. तर विक्रम काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत.

RENUKA KINHEKAR

RENUKA KINHEKAR

All Posts

Latest News

“Cloud & Metaverse Summit 2023”; तं...

February 25th, 2023 International

Related Post

बुली बाई अँप वरून आता हिंदू महिलांवर हल्ला

January 5th, 2022 | RENUKA KINHEKAR

बुली बाई अँप प्रकरणात मुस्लिम महिलांना टार्गेट केले गेले. आता याच प्रकरणी हिंदू समुदायातील महिलांविषयी आक्षेपार्ह्य मजकूर ...

भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील सहकार्यासाठी 40 हून...

September 20th, 2022 | RAHUL PATIL

नवी दिल्‍ली: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण व वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोय...

दिलासादायक: देशात बाधितांपेक्षा बरे होणारे तिपटीने

February 15th, 2022 | RAHUL PATIL

देशात गेल्या २४ तासात बाधित होणाऱ्यांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या तिपटीने वाढली आहे. गेल्या २४ तासात २७ हजार ४०९...