मुंबई: राज्यात 2024 मध्ये होणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही आम्ही एकट्याने लढणार आहोत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र लढावे की स्वतंत्र, हा त्यांचा प्रश्न आहे.
राज्यसभेच्या झटक्यातून महाविकास आघाडी योग्य निर्णय करेल. विधान परिषदेसाठी सोमवार (दि. 13) अर्ज माघारीची शेवटची मुदत आहे. राज्यसभा निवडणुकीत मत दाखवूनही आम्ही विजयी झालो. विधान परिषदेला गुप्त मतदान असल्यान आम्हीच बाजी मारणार असल्याचे ते म्हणाले.
मात्र त्यावेळी 42 ते 43 खासदार आणि विधानसभेला 160 ते 170 जागा घेणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ‘ये तो झांकी है, 20 तारीख अभी बाकी है. देवेंद्र फडणवीस यांना अनेकांनी हात दाखवून आम्ही तुमच्या सोबत असल्याचे राज्यसभेच्या निवडणुकीतच दाखवून दिले आहे, असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला.
ईडी हातात द्या, फडणवीस सुद्धा मतदान करतील हे वक्तव्य म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असे आहे. आमदारांना नोकर समजता का? बोलवून दम देता, विकास निधी रोखता. आपण स्वतः याबाबत मुंबई उच्च न्यायालयात पिटिशन दाखल करणार आहे, असे सांगून पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर ‘बाण’ मारला.