श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) : सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) ने गुरुवारी ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून श्रीनगरमधील लोकांसाठी शस्त्रे प्रदर्शनात ठेवून त्याची माहिती दिली.
बीएसएफचे कॉन्स्टेबल, शक्तीसिंग भाटी म्हणाले, “आम्ही अनेक शस्त्रे जसे की मोर्टार इत्यादी लोकांसमोर ठेवली आहेत. आम्ही शस्त्रे आणि स्फोटक द्रव्यांबद्दल येणाऱ्या लोकांना समजावून सांगत आहोत. हा आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाचा एक भाग आहे.” “अशा प्रकारचे आणखी कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत.
उपस्थित तरूणीपैकी पूजा हिने सांगितले की, अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे तरुणांमध्ये सैनिक आणि ते वापरत असलेल्या शस्त्रास्त्रांबद्दल जागरूकता निर्माण होते. देशाबद्दल व भारतीय जवानाबद्दल आदर वाढून देशसेवा करण्यासाठी इतर तरूणांना प्रेरणा मिळते.