खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत सलग दोन दिवसांपासून सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर निशाणा साधत आहेत. अग्रलेखातून राणेंवर टीका करत राणे फार दिवस मंत्रिमंडळात राहणार नाही, याबद्दल फडणवीसांच्या मनातही शंका नाही, असं म्हणत राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे.
दरम्यान राऊतांनी अग्रलेखातून केलेल्या टीकेला भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. ‘ज्या लावारीस संजयला आपला बाप माहीत नाही त्याला काय किंमत द्यायची, अशी बोचरी टीका नितेश राणेंनी केली आहे.
नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
कोण राणे म्हणणारे 2 दिवसांपासून सामनातून अग्रलेख लिहून आपण मुख्यमंत्री ठाकरेच्या मिठाला जागतो. आणि पवारांचा लोंबता नाही हे दाखवत आहे. स्व माँ साहेबांबद्दल याच नालायकाने काय लिहिलं होतं हे लोकप्रभामध्ये वाचावं, असा टोला त्यांनी लगावलाय. तसेच ज्या लावारीस संजय राऊतला आपला बाप कोण आहे हेच माहित नसेल त्याला काय किंमत द्यायची, असं नितेश राणे म्हणालेत.
दरम्यान, मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून ते महान किंवा असामान्य झाले असतील तर त्यांच्या डोक्यातली हवा मोदीच काढतील हे पक्के. पंतप्रधान मोदी हेच त्यांच्या मंत्रिमंडळात सबकुछ आहेत. मंत्री येतात आणि जातात. मोदी हे स्वतःला फकीर समजतात व राणे ‘महान’ हा फरक समजून घेतला तर राणे हे केंद्रीय मंत्रिमंडळातले थोड्याच दिवसांचे ‘मेहमान’ आहेत याविषयी फडणवीसांच्या मनातही शंका नसावी, अशी टीका राऊतांनी अग्रलेखातून केली.