1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अनिल देशमुख: मी गृहमंत्री असताना सचिन वाझेला सरकारी नोकरीतून काढण्याची प्रक्रिया चालू केली आणि …

thumbnail-thefreemedia
Spread the love

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. मात्र, आज (१ नोव्हेंबर) ते स्वतः ईडी कार्यालयात हजर झाले. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करणारे व्हिडीओ देखील ट्वीट केले. यात अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि अँटेलिया स्फोटक प्रकरणाती आरोपी सचिन वाझेवर गंभीर आरोप केलेत. तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरही हल्ला चढवला.

अनिल देशमुख म्हणाले, “परमबीर सिंह यांचा सहकारी एपीआय सचिन वाझे त्याने सुद्धा परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. आज सचिन वाझे खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. वाझे या आधी देखील अनेकदा तुरुंगात होता. मी गृहमंत्री असताना सचिन वाझेला सरकारी नोकरीतून काढण्याची प्रक्रिया चालू केली. त्याला सरकारी नोकरीतून काढल्यावर त्याने माझ्यावर आरोप केले.

“जो माझ्यावर आरोप करून देश सोडून पळून गेला त्यासाठी माझी ईडी-सीबीआय चौकशी”

“परमबीर सिंह आणि सचिन वाझेसारख्यांच्या आरोपांवर माझी चौकशी होत आहे. माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे. त्याबद्दल मला अतिशय दुःख आहे. मी सरळ मार्गाने, नैतिकतेला धरून चालणारा व्यक्ती आहे. ३० वर्षांच्या सामाजिक-राजकीय जीवनात माझ्यावर एकही आरोप झाला नाही. पण जो माझ्यावर आरोप करून देश सोडून पळून गेला आणि सचिन वाझे जो अनेकदा तुरुंगात गेला, आज खुनाच्या आरोपात तुरुंगात आहे त्यांच्या आरोपावरून माझी ईडी, सीबीआय चौकशी सुरू आहे, ही दुःखाची गोष्ट आहे,” असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    आर्यन खानने अनन्याकडे गांजाची मागणी केली?

    October 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअनन्या पांडेने केला खुलासा मुंबईतील एका क्रुझ ड्रग्ज प्रकरणी अनन्या पांडे ही अभिनेत्रीदेखील अडचणीत सापडलीय....

    ‘राष्ट्रवादीने कॉंग्रेसमध्ये विलीन व्हायला हवं...

    September 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये काँग्रेसची स्थितीबद्दल भाष्य केलं होतं. काँग...

    विदर्भातील बड्या नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी

    November 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपक्षावर नाराज असलेले विदर्भातील भाजपचे दिग्गज नेते रविंद्र भोयर (छोटू) यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. रविंद...