1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

विधान परिषद निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळेंना कुणाचे आव्हान?

Chandrashekhar Bawankule
Spread the love

काँग्रेसकडून अद्याप उमेदवाराची घोषणा नाही, तगडा उमेदवार देणार – ठाकरे

विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपनं ओबीसी कार्ड खेळत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिलीय. या माध्यमातून भाजपनं काँग्रेसपुढं तगडं आव्हान उभं केलंय. दुसरीकडे काँग्रेसचा अद्याप उमेदवार ठरलेला नाही.

काँग्रेसनं उमेदवार ठरविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काल एक बैठक घेतली. यात काही नावं हायकमांडकडे पाठविण्यात आलेत. भाजपला टक्कर देण्यासाठी कॉंग्रेसही ओबीसी उमेदवारी देणार असल्याची माहिती काँग्रेसचे आमदार आणि नागपूर शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिलीय.

अधिक जोमाने काम करणार :बावनकुळे

गेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे नाराज असल्याचं बोलल जात होतं. पण, त्यांनी पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावली. पक्षाच्या प्रचारासाठी इमाने इतबारे काम केलं. आता पक्षानं त्यांना पुन्हा संधी दिली आहे. आता पुन्हा विधिमंडळात जोमानं काम करणार असल्याचा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केलाय.

कोराडी वीज प्रकल्पग्रस्तांसाठी संघर्ष
चंद्रशेखर बावनकुळे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. कुटुंबात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. 1990 पासून त्यांनी कोराडी वीज प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आंदोलनं करून जेलमध्येही गेले. छत्रपती सेना या संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक कामे केलीत. 1995 मध्ये नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजयुमोचे उपाध्यक्ष, जिल्हा महामंत्री अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या.

भाजपने दिली होती जि.प.ची उमेदवारी
1997 मध्ये कोराडी जिल्हा परिषद क्षेत्रातून भाजपकडून उमेदवारी मिळाली. त्यावेळी ते निवडून आले. 2002 मध्ये जिल्हा परिषदेत दुसऱ्यांना निवडून आल्यानंतर ते झेडपीत विरोधी पक्षनेते झाले. 2004 मध्ये कामठी विधानसभा क्षेत्रातून भाजपने त्यांना उमेदवारी दिली. त्यात त्यांनी विजय संपादन केला. त्यानंतर पुन्हा दोनदा ते आमदार झाले. मंत्रीपद मिळाल्यानंतर नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    महाविकास आघाडीला उखडून टाकण्याची भाषा करू नका

    November 15th, 2021 | THE FREE MEDIA

    Spread the loveआम्ही खपवून घेणार नाही; नवाब मलिक यांचा भाजपाला इशारा त्रिपुराच्या घटनेच्या निषेधार्थ अमरावती, नांदेड, माले...

    वीज कंपन्यांतील नियमित व सहायक कर्मचाऱ्यांना सानुग्र...

    October 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्य सरकारच्या वीज कंपन्यांमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचा निर्णय ऊर्जा...

    राष्ट्रवादीच्या आमदाराला भर चौकात जीवे मारण्याची धमक...

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीचे निनावी पत्र आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. श...