आगामी काळात पाच राज्यांमध्ये निवडणुका होत असल्याने देशातील राजकीय पक्षांनी आत्तापासूनच तयारी करण्यास सुरुवात केली आहे. यातच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवा दौरा करत भाजपला गोवा विधानसभा निवडणूकीमध्ये प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं साकडं यावेळी गोमंतकियांना घातलं आहे. तसेच गोव्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपबरोबर कॉंग्रेस, तृणमुल कॉंग्रेस, आम आदमी पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि शिवसेना या पक्षांनी विधानसभा निवडणूकीची जय्यत तयारी सुरु केली आहे.
दरम्यान, पुढील वर्षी होणारी गोवा विधानसभा निवडणूक आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका जिंकण्यात आम्ही यशस्वी होणार आहे. पणजीत निवडणूक प्रचार कार्यालय सुरु केल्यानंतर चिदंबरम कार्यकर्त्यांना संबोधित करताना चिदंबरम यांनी विश्वास व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले, ‘मला तुम्हाला इतिहासातील एक गोष्ट सांगायची आहे..जो कोणी गोवा जिंकतो, दिल्लीत जिंकतो. 2007 मध्ये आम्ही गोवा जिंकलो..2009 मध्ये आम्ही दिल्ली जिंकलो. दुर्दैवाने 2012 मध्ये आम्ही गोवा गमावला, 2014 मध्ये आम्ही दिल्लीलाही गमावले. 2017 मध्ये गोवा जिंकला (कामगारांचा संदर्भ देत) पण आमचे आमदार ते हरले. ते म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले.