दीड वर्षांच्या काळानंतर करतारपूर कॉरिडॉर पुन्हा खुला झाला आहे. जगण्यात सेवेचा मार्ग स्वीकारल्याने आयुष्य सफल होते . याच भावनेने सरकार काम करते आहे. गेल्या अनेक पिढ्यांनी पाहिलेली स्वप्ने आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
शेतकऱ्यांच्या समस्या मी पाहत आलो आहे. २०१४ साली मला जेव्हा पीएमपदातून सेवेची संधी दिली. तेव्हापासून कृषी या विषयाकडे विशेष लक्ष दिले आहे. १०० पैकी ८० शेतकरी हे दोन एकरपेक्षा कमी जमीन असणारे आहेत. बीज, विमा, बाजार आणि बचत या बाबींवर चारीबाजूंनी सरकारने काम केले आहे.
कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १० कोटींहून अधिक आहे. पीक विमा योजनेला अधिक प्रभावी केले आहे. सरकारच्या या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना १ लाख कोटींपेक्षा जास्त पैसे देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी सरकारने प्रयत्न केले. सध्याचे कृषी क्षेत्रााचे बजेट गेल्या काही वर्षांपेक्षा पाच पटीने वाढवले आहे. पीक कर्ज १६ हजार कोटींवर पोहोचवलं.
शेतकऱ्यांच्या विकासासाठी, न्यायासाठी सातत्याने पावले उचलत आहोत. शेतकऱ्यांची आर्थिक, सामाजिक स्थिती चांगली व्हावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी कायदे लागू करण्यात आले. शेतकऱ्यांचा विकास व्हावा, त्यांना योग्य भाव मिलावा, योग्य बाजारपेठ उपलब्द व्हावी, यासाठी कृषी कायदे आणण्यात आले. विचारांती, तज्ज्ञांशी बोलून, संसदेत चर्चा करुन हा कायदा करण्यात आला. देशातल्या हजारो शेतकरी संघटनांनी याचे स्वागत केले, त्यांचे धन्यवाद.
लहान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, देशाच्या हितासाठी, गावांच्या हितासाठी सत्यनिष्ठेने, शेतकऱ्यांप्रति प्रामाणिक हेतूने कायदे करण्यात आले होते. मात्र तरीही काही शेतकऱ्यांनी त्याला विरोओध केला, आम्ही त्यांना समजावू शकलो नाही. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्याबाबत प्रयत्न करण्यात आले, कायद्यात बदल करणे, दोन वर्षे स्थगितीचाही पर्याय दिला होता. सुप्रीम कोर्टातही हे प्रकरण झाले. देशवासियांची क्षमा मागून, पवित्र ह्रद्याने सांगतो की आमच्या तपश्चर्येत काही कमा राहिल्याने शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही.