बैल-पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तान्हा पोळ्याला मारबत बडग्याच्या मिरवणुकी नागपूर शहरातून काढली जाते.
या अभिनव प्रथेच्या माध्यमातून वर्षभर देशात घडलेल्या चांगल्या-वाईट घटनांवर भाष्य करणारे बडगे तयार केली जातात.
देशात एकमात्र नागपुरात हा उत्सव साजरा केला जातो. आज ७ सप्टेंबर रोजी नागपुरात मारबत उत्सव साजरा करण्यात आला.
मारबत उत्सव अनेक वर्षांपासून नागपूरात साजरा केला जातो. दरवर्षी विविध प्रसिद्ध असलेल्या थीमवर मारबत काढण्यात येते.
पिवळी मारबत उत्सव गेल्या १३७ वर्षांपासूनच अविरत साजरा करण्यात येतो तर काळ्या मारबतीलाही १४१ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे.
मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा आहे. अनेक लोक हि मारबत मिरवणूक पाहण्यास गर्दी करतात.
यंदा कोरोनाचं सावट असल्याने मारबत उत्सव कमी लोकांमध्ये साजरा करण्यात येईल असे समितीकडून सांगण्यात आले होते.
त्यातच नागपुरात कोरोना रुग्णसंख्या वाढतेय. कोरोनाला घेऊन जा रे मारबत’, असं साकडं नागपूरकरांनी मारबतीला घातलं होतं.
मात्र, उत्सवातील प्रचंड गर्दी पाहून खरंच मारबत कोरोना नेणार कि या गर्दीमुळे कोरोनाला आमंत्रण मिळाल आहे? असा प्रश्न पडला आहे. कोरोनचे नियम अगदी पायमल्ली तुडविल्या गेल्याचे दिसत आहे. सोशल डिस्टन्स तर सोडाच कोणी मास्क लावलेले देखील नाही आहे.
देशात फक्त नागपुरात मारबत उत्सव साजरा केला जातो.
यामध्ये काळी आणि पिवळी अशा दोन मारबती असतात.
दोन्ही मारबतींची नेहरू पुतळा चौकात भेट होते. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होते.स्वातंत्र्यपूर्व काळात बकाबाईने इंग्रजांशी हातमिळविणी केली होती.
त्याच्या निषेधार्थ ही काळी मारबत काढली जाते. तसेच या मारबतीला रोगराई पळवून नेण्याचं आवाहन केलं जातं.
दरवर्षी मारबत उत्सवाच्या मिरवणुकीत लाखो लोकांची गर्दी असते. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असल्याने अत्यंत कमी लोकांमध्ये हा उत्सव साजरा करण्याची परवानगी देण्यात आली होती.
नागपुरात गेल्या चार दिवसांपासून सातत्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
तसेच गेल्या लाटेतील अनुभव पाहता नागपूरकरांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काळी मारबत मिरवणुकीमध्ये उल्लंघन करण्यात आले. पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपुरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता नागपुरात तिसरी लाट आल्याचे म्हटले होते.
त्यामुळे काही दिवसांत निर्बंध लावण्याचे संकेत देखील त्यांनी दिले आहेत. “सोमवारी नागपुरात पॉसिटीव्ह कोरोना रुग्णांची संख्या १३ होती. तिसऱ्या लाटेने आपल पाऊल जिल्ह्यामध्ये टाकले आहे.
त्यामुळे याविषयीचे कडक निर्णय आम्हाला घ्यावे लागतील”, असे नितीन राऊत म्हणालेत. नागपूर शहरात सोमवारी दहा नवीन कोरोना रुग्नांची नोंद झाली आणि शून्य मृत्यूची नोंदी झाली. सध्य स्थिस्तीत नागपुरात ५६ एकूण सक्रिय रुग्ण आहेत. या माराबतीत ही प्रचंड उसळलेली गर्दी पाहून कोरोएच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रणच आहे.