काबूल विमानतळावरून आज अमेरिकेच्या सैन्याने काढता पाय घेतला. अशाप्रकारे अमेरिकेने अफगाणिस्तानातील आपली उपस्थिती संपविली. एकीकडे तालिबानी दहशतवाद्यांकडे अमेरिकेची खतरनाक शस्त्रास्त्रे असताना काबूल विमानतळावर मोठ्या प्रमाणावर आणखी काही रॉकेट, आर्टिलरी, मोर्टारसह 73 विमाने अमेरिकेने मागे सोडली आहेत. ही शस्त्रे खूप खतरनाक आणि युद्धासाठी महत्वाची मानली जात आहेत.
अमेरिकी सैन्याने आता अफगाणिस्तान सोडले आहे, मग ही शस्त्रे, विमाने तालिबानच्या ताब्यात जाणार आहेत. परंतु ही शस्त्रास्त्रे तालिबान वापरू शकणार नाहीय. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने याची माहिती दिली आहे. यूएस सेंट्रल कमांडचे कमांड जनरल किनिथ मैकेंजी यांनी सांगितले की, अमेरिकेला विमानतळावर काही शस्त्रे सोडावी लागली आहेत. यामध्ये काऊंटर रॉकेट, आर्टिलरी, मोर्टार (C-RAM) मिसाईल डिफेन्स सिस्टिम आदी आहे. ही शस्त्रे विमानतळावरच ठेवण्यात आली होती. सोमवारी जेव्हा रॉकेट हल्ले करण्यात आले तेव्हा याच सिस्टिमने ही रॉकेट पाडली.
याशिवाय जी वाहने अमेरिकेने तिथे सोडली ती देखील वापरता येणार नाहीत. मात्र, अमेरिकेने त्या 72 विमानांची माहिती दिलेली नाही जी काबुल विमानतळावर सोडलेली आहेत. जी विमाने विमानतळावर सोडली आहे ती आता वापरता येणारी नाहीत, एवढेच अमेरिका म्हणाली आहे