देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल रात्री ही अनोखी ऑफर दिली आहे. भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गावजेवण देणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे या गाव जेवणात आपण स्वतः सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केलं. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सवाल केला आहे.
जेवण एक दिवस देणार आहात की उर्वरीत तीन वर्षे? असा सवाल चंद्रकांत पाटलांना केलाय. तसंच त्यांच्या हातात काही नसल्याचा टोलाही चव्हाण यांनी लगावला आहे.
दरम्यान, सांगलीतही चंद्रकांत पाटलांनी अशीच एक ऑफर दिली होती. सांगली महापालिकेत ‘कार्यक्रम’ करणाऱ्या नेत्यांना तुम्ही दोन छोटे शॉक दिले आहेत. एकदा एक ‘मोठा शॉक’द्या. तुमचा सोन्याचा मुकुट घालून सत्कार करतो, असं पाटील म्हणाले होते.
माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर त्यांना सूनबाई डॉ. मीनल खतगावकर यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिलीय. मीनल खतगावकर यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय. दरम्यान, अशोक चव्हाण यांचे भाऊजी असलेले भास्करराव पाटील खतगावकर यांनी 7 वर्षापूर्वी