1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकणा-या; अवनी लेखराने पॅरालिम्पिक स्पर्धेत रचला इतिहास

avni lekhra
Spread the love

भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत इतिहास रचत वैयक्तिक दुसरे पदक जिंकले आहे. तिने एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकत इतिहास रचला आहे. तिने महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन एसएच १ स्पर्धेत कांस्य पदक मिळवले. अंतिम फेरीत ४४५.९ गुणांसह ती तिसऱ्या स्थानावर राहिली. या स्पर्धेत चीनची झांग क्यूपिंग (४५७.९) आणि जर्मनीची हिलट्रॉप नताशा (४५७.१) या गुणांसह अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरल्या.

अवनी लेखरा पात्रता फेरीत ११७६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होती. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात बारावे पदक जमा झाले आहे. भारताला या स्पर्धेत २ सुवर्ण, ६ रौप्य आणि ४ कांस्य पदक मिळाली आहे. भारताचा पॅरालिम्पिक इतिहासातील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे. रियो पॅरालिम्पिक (२०१६) स्पर्धेत भारताने २ सुवर्ण पदकांसह ४ पदके जिंकली होती.

सोमवारी येथे टोकियो पॅरालिम्पिक गेम्सच्या नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अवनी लेखराने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले होते. १० मीटर एअर पिस्तूलमध्ये अवनी लेखरा हिने २४९.६ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक होते.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    आज पंतप्रधानांनी केली ‘गति शक्ति योजना’ ...

    October 13th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveकोरोना महामारीच्या दुसरी लाटेनंतर आता देशाची अर्थव्यवस्था परत रुळावर येत आहे. केंद्र सरकार अर्थव्यवस्थेला अ...

    “सभागृह म्हणजे लोकशाहीचं तीर्थक्षेत्र”; पंतप्र...

    July 18th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद...

    व्हॉट्सॲप भारतीय न्यायव्यवस्थेमधील कायद्याला विरोध क...

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveव्हॉट्सॲपची मालकी असलेल्या फेसबूकने केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियमांच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात ध...