नागपूर: विचार करा .. कोण किती विश्वासू आहे हे मापणार कोणता साधन असलं तर .. आणि जर कोणाच्या चेहऱ्याचे हावभाव बघून कोण किती निष्ठावंत किंवा किती विश्वासू आहे हे ओळखता आले तर…अशीच एक टेकनॉलजि चीन मध्ये आली आहे. चीनमध्ये कॉम्युनिस्ट पक्षाकरिता एकनिष्ठता खूप महत्वाची आहे. चीनमध्ये कॉम्युनिस्ट पार्टी मध्ये किती विश्वासू लोक हे तपासायला या देशाने टेकनॉलॉजिच्या मदतीने एक नवे पाऊल उचलले आहे.
( TAIPEI An artificial intelligence (AI) in) Hefei comprehensive national science center)हेफेई येथील चायना कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल सायन्स सेंटरमधील संशोधकांनी artificial intelligence च्या मदतीने “माइंड-रिडिंग” software विकसित केल्याचा दावा केला आहे, जे चीनी कम्युनिस्ट पार्टी (सीसीपी) वरील निष्ठा मोजण्यास सक्षम आहे. त्यांचे असे म्हणणे आहे कि हे सिस्टिम चेहऱ्याचे हावभाव ( facial expression) आणि ब्रेन वेव मोजून हे सांगितल्या जाईल कि पक्षचा कोणता सदस्य निष्ठावान आहे.
विश्लेषकांनी सांगितले की, चीनने मोठा डेटा वापरून, मशिन लर्निंग, फेशियल रेकग्निशन आणि AI चा वापर करून ” त्यांच्या लोकांचे विचार आणि मनात काय आहे ते जाण्यासाठी” त्याच्या AI देखरेखीमध्ये सुधारणा केली आहे, ज्याला अनेकांनी कठोर डिजिटल (dictatorship) हुकूमशाही म्हटले आहे.
संस्थेने 1 जुलै रोजी “स्मार्ट पॉलिटिकल एज्युकेशन बार” नावाचा व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्याचा “माइंड-रीडिंग” सॉफ्टवेअरचा उपयोग पक्षाच्या सदस्यांना “पक्षाचे अनुसरण करणे, पक्षाचे ऐकणे, पक्षाबद्दल कृतज्ञ राहण्याचा त्यांचा निश्चय आणखी दृढ करण्यासाठी केला जाईल.
नंतर लोकांच्या आक्रोशामुळे हा व्हिडीओ काढून टाकण्यात आला. हि अतिशयोक्ती असल्याचे काही जणांचे म्हणणे होते. शी जीन पिंग हे राजकीय शिक्षणाला पाठिंबा देणारे आहेत. त्यांचे “Study from (Xi) Strong Country” नावाचे एक अँप देखील आहे जे अलिबाबाने तयार केले आहे. अलिबाबाने विकसित केलेले हे अॅप कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्याला लेख वाचण्यास आणि प्रश्नांची उत्तरे देण्यास भाग पाडते. सदस्यांना अॅपद्वारे दररोज गुणांचा कोटा मिळवावा लागतो.