ओडिशातील ६३ वर्षीय महिलाने स्वतःची सर्व संपत्ती एका रिक्षाचालकाच्या नावे करून दिली. सुताहाट येथील मिनाती पटनायक यांचे म्हणणे आहे की, त्यांचे तीन मजली घर, सोन्याचे दागिने आणि इतर संपत्ती रिक्षाचालक बुद्ध सामल आणि त्याच्या कुटुंबाला २५ वर्ष सेवा केल्याबद्दल एका आदराच्या भावनेने दान करण्याचा निर्णय घेतला. मिनाती पटनायक यांनी त्यांच्या नवऱ्याला व मुलीला गमावल्यानंतर, जवळजवळ रु.१ करोडची त्यांची संपत्ती दान देण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी एनएनआयला सांगितले कि,” माझ्या नवऱ्याच्या आणि मुलीच्या मृत्यू नंतर, बुद्ध सामल आणि कुटुंबाने माझी काळजी घेतली, म्हणून मी स्वतःकडे असलेली संपत्ती त्यांच्या नावे केली. मागील वर्षी त्यांच्या नवऱ्याची किडनी फेल झाल्या कारणाने त्यांनी नवऱ्याला गमाविले. इंडिया टुडेनी सांगितल्याप्रमाणे, त्या त्यांच्या मुली सोबत राहत होत्या, पण त्यांच्या मुलीला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला. मी माझ्या मुलीच्या आणि पतीच्या निधनाने दुखी होते, माझ्या परिवाराने मला साथ दिली नाही. पण कठीण काळात मला रिक्षावाला बुद्ध सामल आणि त्याच्या परिवाराने साथ दिली.”
६३ वर्षीय महिलेने रिक्षाचालकाबद्दल सांगितले की, “माझा त्याच्यावरील विश्वास आणि माझ्या आणि माझ्या कुटुंबाप्रती असलेल्या समर्पणामुळे त्याला फळ मिळाले आहे आणि मी त्याला माझी संपत्ती देऊन कोणतेही मोठे काम केले नाही, तो आणि त्याचे कुटुंब यासाठी पात्र आहे. ” मिनाती पटनायक त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची मालमत्ता बुद्ध सामलकडे हस्तांतरित केली जाईल याची खात्री करण्यासाठी योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले गेले आहे.